मुंबई – भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांना जेल पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं ठरवल्याचं त्यांनी असे अनेकदा प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. मागच्या अनेत दिवसांपासून त्यांनी महाराष्ट्राचे (maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावरती भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. त्यावर संजय राऊत यांनी देखील किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने देखील घोटाळा केले असल्याचे सांगितले. अनेक दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घोटाळे केल्याची प्रकरण बाहेर निघत असताना महाराष्ट्रातलं राजकारण अधिक गरम झाल्याचं पाहायला मिळालं. किरीट सोमय्या पुणे महानगर पालिकेत असताना त्यांच्यावरती अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला त्यामुळे अधिक चिडलेल्या सोमय्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना धडा शिकवणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालना सहकारी साखर कारखाना (एसएसके) घोटाळ्यावर कारवाई सुरू असून . ईडीने जिल्हाधिकाऱ्यांना SSK च्या कोणत्याही मालमत्तेच्या विक्री हस्तांतरणास परवानगी देऊ नये असे सांगितले आहे.
शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालना सहकारी साखर कारखाना (एसएसके) घोटाळ्यावर कारवाई सुरू. ED ने जिल्हाधिकाऱ्यांना SSK च्या कोणत्याही मालमत्तेच्या विक्री हस्तांतरणास परवानगी देऊ नये असे सांगितले आहे @BJP4Maharashtra pic.twitter.com/GyiG2Wgi0o
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 3, 2022
किरीट सोमय्या दिल्ली दरबारी असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
आज मुंबईत अधिवेशन असताना किरीट सोमय्या दिल्ली दरबारी असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण किरीट सोमय्यांनी आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या 12 नेत्यांवरती भ्रष्टाचार केल्याचा आहे. नवाब मलिक यांच्यावरती त्यांनी जमीन गैरव्यवहाराचा आरोप केला होता. त्यामुळं त्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यापासून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी असा कलगीतूरा रंगल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी भाजप केंद्रातून केंद्रीय यंत्रना चुकीच्या पद्धतीने चालवत असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी ज्यांनी घोटाळा केला आहे, त्यांना ताब्यात घेण्याच काम सुरू असल्याचं त्यांनी म्हणटलं आहे. त्यामुळे अधिवेशनात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नवाब मलिकांचा अजून एक घोटाळा सापडल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
जमिनीच्या प्रकरणात ईडीने ताब्यात घेतलेले महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांची चौकशी सुरू असून ईडीने अधिकृत अशी कोणतीही माहिती सांगितलेली नाही. त्यांनी घेतलेल्या जागा आणि इतर मालमत्तांची चौकशी सुरू असल्याचे किरीट सोमय्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले होते. त्यामुळे आज त्यांच्या हाती नवा घोटाळा लागला असल्याची माहिती मिळत आहे. तो घोटाळा पाकिस्तानशी संबंधित असल्याचं देखील किरीट सोमय्यांनी म्हणटलं आहे. त्यामुळे आता नवाब मलिकांचा नेमका कोणता घोटाळा मलिकांच्या हाती लागला आहे. हे किरीट सोमय्या लवकरचं सांगण्याची शक्यता आहे.