Kirit Somaiya : अनिल परबांचं कथित रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या दापोलीत! आता उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

| Updated on: Mar 26, 2022 | 7:19 PM

मी उद्धव ठाकरेंना सांगतो की, तुमच्या सांगण्यावरुन तुम्हाला अटक होणार नाही. तुमचा भ्रष्टाचार समोर आला की तुम्हाला सांगण्याचीही गरज भासणार नाही. तुमच्याविरोधात कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही, अशा शब्दात सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय.

Kirit Somaiya : अनिल परबांचं कथित रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या दापोलीत! आता उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज
किरीट सोमय्या
Image Credit source: TV9
Follow us on

दापोली : शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचं कथित साई रिसॉर्ट तोडण्याच्या मागणीसाठी आता भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) दापोलीत दाखल झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासह मोठा ताफा सोमय्या यांच्यासोबत होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमय्यांना दापोलीत पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा देण्यात आला होता. मात्र, मोठ्या ताफ्यानिशी सोमय्या आज दापोलीत दाखल झाले. यावेळी अनिल परब यांचं कथित रिसॉर्ट तर तोडणारच असा दावा सोमय्या यांनी केलाय. इतकंच नाही तर सोमय्या यांना यावेळी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिलंय.

उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस थोड्या स्पष्ट, स्वच्छ, अलंकारिक भाषेत उत्तर देतात. पण मी उद्धव ठाकरेंना सांगतो की, तुमच्या सांगण्यावरुन तुम्हाला अटक होणार नाही. तुमचा भ्रष्टाचार समोर आला की तुम्हाला सांगण्याचीही गरज भासणार नाही. तुमच्याविरोधात कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही, अशा शब्दात सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय. तसंच काल आयकर विभागाचे डिटेल्स आहेत. एका कंपनीचे आकडे दिले आहेत. त्यात आदित्य, तेजस, रश्मी ठाकरे पार्टनर असलेल्या कंपनीत 7 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग. तो जो नंदकिशोर चतुर्वेदीसोबत उद्धव ठाकरे परिवाराने किती व्यवहार केला ना तो सगळा बाहेर काढणार, असंही सोमय्या यावेळी म्हणाले.

‘अनिल परबचा रिसॉर्ट वाचवून दाखवा, मी तोडून दाखवणार’

सोमय्या पुढे म्हणाले की, मला कौतुक करायचं आहे दापोलीतील नागरिकांचं. दिवाळीत आल्यावर दापोलीकरांना वचन दिलं होतं की अनिल परबची माफियागिरी संपवल्याशिवाय राहणार नाही. समजतात काय स्वत:ला. मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला आणि अनिल परबचा रिसॉर्ट तोडणार. मी उद्धव ठाकरेंना चॅलेंज देतो. तुमच्यात हिम्मत असेल तर अनिल परबचा रिसॉर्ट वाचवून दाखवा, मी तोडून दाखवणार. माफिया सेना उभी केली, वसुलीचे पैसे येतात. सचिन वाझेपासून प्रदीप शर्मा सुपारीबाज… आता नरेंद्र मोदींनी सांगितलं ना ना खाऊंगा ना खाने दुंगा. महाराष्ट्रातील घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही. नाटकं काय करतात, पोलिस नोटीस देतात. अडकणार पोलीस, इथला इन्स्पेक्टर. पोलिस काय सांगतात तर रिसॉर्ट तुटल्यावर बेरोजगारी निर्माण होईल. मोदी सरकारनं दापोली कोर्टात अनिल परब विरोधात फौजदारी कारवाई करावी असं अपील केलंय. पोलिसांना बळीचा बकरा काय करताय, अशी जोरदार टीका सोमय्या यांनी यावेळी केलीय.

‘पुढच्या आठवड्यात तिघांवर कारवाई’

‘हा प्रतिकात्मक हातोडा परबचा रिसॉर्ट पाडण्यासाठी आणलाय पण ठाकरे सरकारचा एक एक भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. सुप्रिया सुळे बसून सांगतात सोमय्याला कसं कळतं कुणावर कारवाई… ताईंना आज सांगतो पुढच्या आठवड्यात तिघांवर कारवाई होणार’, असा दावाही सोमय्या यांनी यावेळी केलाय.

इतर बातम्या : 

Devendra Fadnavis : ‘उत्तर नसतं तेव्हा भावनेचा आधार घेतला जातो’, फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यानं छळवणूक केली, फोन टॅपिंग केलं ईडी मागं लावली: एकनाथ खडसे