मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar News) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेले आरोप साफ फेटाळून लावले. शिवाय दादर पोलीस स्थानकात (Dadar Police Station) चौकशीला मी जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे दबावतंत्र असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कसंही करुन मला अडकवण्याचा हा प्रयत्न असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी यावेळी म्हटलंय.
एसआरए गाळ्यांवर किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यांची कालही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलणवण्यात आलं होतं. दरम्यान, ज्या एसआरए गाळ्यावरुन त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते, तिथे त्या आज सकाळी दाखल झाले होते.
दरम्यान, यावेळी गाळेधारकांसोबत यावेळी किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांसमोर बातचीत केली आहे. दरवेळी प्रत्येक गोष्टीला आरोपीच्या पिंजऱ्या उभं केलं जातं, असा आरोपही त्यांनी यावेळी केली.
किशोरी पेडणेकरना आज पुन्हा दादर पोलिस स्टेशन यावे लागणार
दादर पोलीस स्टेशन १२ एसआरए फ्लॅट्सच्या फसव्या विक्री
किश कॉर्पोरेट कंपनी विरुद्ध मरीन लाईन्स पोलिस स्टेशनची चौकशी
वरळी 6 SRA फ्लॅटच्या बेकायदेशीर ताबा
किश कॉर्पोरेटला बीएमसी कोविड कॉन्ट्रॅक्ट
माझी हायकोर्टात याचिका
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 29, 2022
गोमाता नगरमध्ये मी 2017 साली अर्ज भरला होता, असं त्या म्हणाल्या. कारण नसताना आता या सगळ्याप्रकरणी पुन्हा राळ उठवली जाते आहेत. गामातामध्ये काही दुकानं आणि बालवाड्या सोसायटीच्या ताब्यात आहेत. इथला एक जरी गाळेधारक बोलला की गाळे किशोरी पेडणेकर यांचे आहेत, तर कुलूप लावा, असं थेट आव्हानही त्यांनी केलं.
एका सामान्य महिलेला त्रास दिला जात असल्याचा आरोप पेडणेकर यांनी सोमय्यांवर केला. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. किशोरी पेडणेकर यांच्यावर सनसनाटी आरोप किरीट सोमय्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्याला किशोरी पेडणेकर यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. जाणीवपूर्ण टार्गेट केलं जात असल्याचं टोला त्यांनी यावेळी लगावलाय.