मुंबई : काय झाडी..काय डोंगार..काय हॉटील..! ह्या एका वाक्याने चर्चेत आलेले (MLA Shahajibapu Patil) आ. शहाजीबापू पाटील आजही त्यांची चर्चा ही होतेच. मात्र, बापू केवळ चर्चेतच आले नाहीतर माध्यमांमध्येही चांगलेच झळकले आहेत. असे असतानाच त्यांनी (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांचे योगदान काय असा सवाल उपस्थित करीत ठाकरे नाव काढले तर लोक जमाही होणार नाहीत अशी टिका केली होती. याला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी (Shiv sena) शिवसेना स्टाईलने उत्तर दिले आहे. ते एक वाक्य होते, ज्याच्या माध्यमातून प्रसिध्दीच्या झोकात आलात. याचा अर्थ त्यांनी काहीही हिम्मत करु नये. ठाकरे नाव काढून घ्या असे सांगण्याची त्यांची हिम्मतच कशी झाली. त्यांचे अडनाव काढून घ्यायला लावता आणि त्यांचे नाव लावता. एवढ्या खालच्या स्तराचे राजकारण कशासाठी असा सवालही त्यांनी शहाजी पाटलांना विचारलेला आहे.
आदित्य ठाकरे हे सध्या निष्ठा यात्रेच्या माध्यमातून राज्यभर शिवसैनिक आणि जनतेच्या गाठीभेटी घेत आहेत. शिवाय बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन ते त्यांचा उल्लेख गद्दार असा करीत आहेत. यावरुन शहाजी बापू पाटलांना विचारले असता. आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी केवळ ठाकरे हे नाव लागल्याने चार माणसं तरी गोळा होतात. त्यांनी ठाकरे नाव काढून फिरल्यावर काय अवस्था होईल असा प्रश्न तर बापूंनी उपस्थित केलाच पण लहानपणी संस्कार व्यवस्थित झाले नसल्याने आता ते वडिलधाऱ्यांना असे बोलत असल्याची टिकाही त्यांनी केली.
शहाजीबापू पाटलांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टिका करताच किशोरी पेडणकर यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यांचे आडनाव हे ठाकरे आहेच त्यांना हे नाव काढण्याचा सल्ला देतात आणि बाळासाहेब ठाकरे यांचे हे नाव लावतात. अजब आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न घेता यांचा एक दिवस जात नाही. त्यांच्या नावाशिवाय राजकारण करण्याची यांची हिम्मत होईना तेच त्यांच्या नातवाला ठाकरे नाव काढण्याचा सल्ला देत आहेत. ही गुर्मी कशाची असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरे हे पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आणि थेट जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात दाखल होत आहेत. कोकण, नाशिक, मराठवाड्यात दौरा केल्यानंतर ते पुणे येथे आज दाखल होत आहेत. दरम्यानच्या काळात ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांचा गद्दार असा उल्लेख करीत आहेत. यावरुन आमदार आणि आदित्य ठाकरे यांच्या आता शाब्दिक चकमक पाहवयास मिळत आहे.