नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष पदाच्या(Congress President Election) शर्यतीत मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांनी बाजी मारली आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते खरगे आणि तिरुवनंतपुरम लोकसभा मतदार संघाचे शशी थरुर (Shashi Tharoor) यांच्यांत काँग्रेस अध्यक्षपदावरुन सामना रंगला होता. काँग्रेस पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक (Election) झाली. खरगे यांना एकूण 7897 मते (Total Votes) मिळाली आहेत.
काँग्रसेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना किती मते मिळाली हे आपण पाहिले आहे. पण त्यांची एकूण संपत्ती (Assets) किती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? त्यांची संपत्ती किती कोटी रुपयांची हे माहिती आहे का? चला तर त्यांची चल अचल संपत्ती किती आहे ते पाहुयात..
2019 मधील लोकसभा निवडणुकीवेळी खरगे यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती शपथपत्राद्वारे दिली होती. निवडणुकीतील नामनिर्देशपत्रासोबत संपतीच्या विवरणाचा तपशील मांडावा लागतो. प्रत्येक उमेदवार यामध्ये त्याच्याकडील चल-अचल संपत्तीची माहिती देत असतो.
खरगे यांनी त्यांची एकूण संपत्ती त्यावेळी जाहीर केली होती. त्यानुसार, त्यांच्याकडे एकूण 15,77,22,896 रुपयांची संपत्ती आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती असताना त्यांच्या डोक्यावर 31,22,000 रुपयांचे कर्जाचे ओझे आहे. म्हणजे संपत्ती असली तरी त्यात कर्जाचा भार आहे.
त्यांच्याकडे एकूण 6.50 लाख रुपयांची नगद आहे. त्यांनी याविषयीची माहिती शपथपत्रात दिली आहे. यातील 2.5 लाख रुपये नगद ही त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. संपत्तीचे विवरण त्यांनी निवडणुकीवेळी सादर केले होते.
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 6 हून अधिक बँकांची खाते आहेत. यामध्ये प्रगती ग्रामीण बँक, कॅनरा बँक, कॉर्पोरेशन बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांची प्रमुख खाती आहेत.
या सर्व बँक खात्यात एकूण 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम असल्याचे शपथपत्रात सांगण्यात आले होते. तसेच त्यांनी अन्य सरकारी योजनांमध्ये जसे की, एनएसएस, पोस्टल सेव्हिंग स्कीम, एलआयसी यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केलेली नाही.
खरगे यांनी बाँड्समध्ये जवळपास 25 लाख रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. तर मुदत ठेव योजनेत त्यांचे 8 हून अधिक खाती आहेत. ही सर्व खाते स्टेट बँकेत आहेत. केवळ मुदत ठेव योजनेतच त्यांची 65 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. त्यावर त्यांना भरमसाठ व्याज मिळते.