Eknath Shinde vs Thackeray Government : सूरतमध्ये 21 जून रोजी संध्याकाळनंतर हालचालींना वेग आला होता. पोलीस सतर्क झाले होते. भाजप नेते (BJP Gujrat) कामाला लागले होते. अंतर्गत चर्चा आणि कुजबूज जोरात होती. काहीतर मोठं होणार आहे, याची कूणकूण पोलिसांना लागली होती. पण नेमकं ते काय? हे जेव्हा कळलं, तोपर्यंतच तर सूरत अगदी व्यवस्थित सज्ज झालं होतं. हॉटेलबाहेर तगडा बंदोबस्त तैनात होता. माध्यमांच्या गाड्या येतील, त्याआधीच चेकनाके गुजरातमध्ये (Suraj, Gujrat) सज्ज झाले होते. पुढे काय होणार आहे? याची जणू आधीच सगळ्यांना कल्पना होती. शिवसेनेचे आमदार घेऊन जाण्याआधी इतकी बडदास्त कशी ठेवली गेली? याचं प्लानिंग कुणी केलं? इतकं चोख नियोजन करण्यामागे कुणाचा हात होता? या सगळ्याबाबत महत्त्वाचं नाव समोर येतंय. या मागचा चेहरा आहे, सीआर पाटील. संपूर्ण नाव चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील आपल्या महाराष्ट्रातले नव्हे तर गुजरातचे खासदार. या सगळ्याची चंद्रकांत रघुनाथ पाटील (CR Patil, Gujrat, BJP) यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचं सांगितलं जात होतं. सूरतमध्ये आमदारांना आणायचं, त्यांना तिथे सुरक्षित ठेवायचं, आणि मग त्यांना तिथून पुन्हा आसामला पाठवायचं, हे सगळं नियोजन चोख व्हावं म्हणून सीआर पाटील यांनी आपले नेते कामाला लावल्याचं आजतकने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.
भाजप वर वर आपला या बंडखोरीशी काहीही संबंध नाही, असं म्हणतं. पण भाजपचा या सगळ्यामागे किती आणि कसा हात आहे, हे काही आता कुणापासून लपून राहिलेलं नाही. भाजपचे दोन आमदार संजय कुटे आणि मोहित कंबोज हे देखील बंडखोर शिवसेना आमदारांसोबत दिसून आले होते. या सगळ्या बंडखोरीचं केंद्रस्थान सूरत बनलं. सूरत हेच ते ठिकाण का? यामागेही एक कारण होतं. मुख्य म्हणजे सूरतचं स्थानिक प्रशासन पूर्णपणे सीआर पाटील यांना कंट्रोल करणं शक्य होतं. दुसरं म्हणजे आमदारांना सूरतला रस्ते मार्गे घेऊन जाणं सोपं आणि फारसं धोक्याचं नव्हतं.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार सूरत महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष परेश भाई पटेल, अमित राजपूत, महापौर दिनेश भाई जोधानी, दिशेन भाई राजपुरोहित आणि भाविन भाई टोपीला, या भाजप नेत्यांना सीआर पाटील यांनी कामाला लावलं होतं. या नेत्यांकडून महाराष्ट्रातून सूरतमध्ये आलेल्या आमदारांची बडदास्त ठेवली जात होती. सीआर पाटील हे गुजरात भाजपचे अध्यक्ष आहेत. वर नमूद केलेले सर्व भाजपचे नेते हे त्यांचे अगदी जवळचे असल्याचंही सांगितलं जातं.
21 जून रोजी संध्याकाळी आठ वाजता आमदार येणार आहे, याची कल्पना पोलिसांनी देण्यात आली. त्यानंतर सूरत पोलिसांमध्येही खळबळ माजलेली होती. सूरत एअरपोर्टवर असलेल्या ली मेरिडियन हॉटेलात आमदारांना कोण भेणार आणि कुणाला भेटू द्यायचं नाही, हे पण भाजपचे नेते ठरवत असल्याचं आजतकच्या वृत्तामध्ये म्हटलंय. त्यानुसारच हॉटेलमध्ये लोकांना प्रवेश दिला किंवा नाकारला जात होता.
या बंडाचं नियोजन एका रात्रीतून झालेलं नसणार, हेही तितकंच खरं. बराच काळापासून या सगळ्याचं नियोजन सुरु होतं. याची जबाबदारी विचारपूर्ण भाजपने सीआर पाटील यांच्याकडे दिली होती. याआधी जेव्हा जेव्हा त्यांच्यावर एखादी मोहीत सोबवली गेली, तेव्हा तेव्हा सीआर पाटील यांनी पक्षाचा विश्वास खरा करुन दाखवला होता.
महाराष्ट्रात 2019 मध्ये शिवसेनेनं भाजपसोबत न जाता काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत केलं. मुख्यमंत्रीपदाच्या वादावरुन सुरु झालेला मुद्दा इतका ताणला केला, की भाजपला वाटलंही नव्हतं, ते शिवसेनेनं करुन दाखवलं. यानं भाजपही हादरली होती. गेल्या अडीच वर्षांपासूनच शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली काम करत असलेल्या मविआ सरकारला घेरण्याची कोणतीच संधी भाजपने सोडली नव्हती. पण हळूहळू शिवसेनेतील अंतर्गत रोष वाढत गेला. उद्धव ठाकरेंचा वेळीच यावर काम करता आलं नाही की त्यांनी मुद्दाम केलं नाही? असाही प्रश्न निर्माण होतोय.