Marathi News Politics Kolhapur by election result 2022 from BJP devendra fadnavis to Congress Satej Patil know who and how will be reponsible for win and loss in kolhapur north bypoll election 2022
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक : फडणवीस ते सतेज पाटीलपर्यंत प्रतिष्ठा कुणाकुणाची कोल्हापुरात पणाला?
Kolhapur Election Result 2022 : भाजपच्या देवेंद्र फडणवीसांसून ते काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्यापर्यंत सगळ्यांनी या पोटनिवडणुकीत कोल्हापूर उत्तरचा मतदारसंघ पिंजून काढलाय.
कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Vidhansabha Bypoll Elections 2022) चुरशीची लढत होते आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकाल 2024च्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं महत्त्व प्राप्त झालं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेचा पोटनिवडणूक ही 2024 च्या निवडणुकांची (Maharashtra State Assembly Elections 2022) लिटमस चाचणी असेल, असं म्हटलं जातंय. त्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा या पोटनिवडणुकीत लागली आहे. या पोटनिवडणुकीत ज्या कुणाचा विजय होतो, त्याच्या आत्मविश्वास तर दुणावेलच. पण ज्याचा पराभव होईल, त्याची नाचक्कीही होणार, हेही तितकंच खरं! ही पोटनिवडणूक जरी असली, तरी या पोटनिवडणुकीकडे महाविकस आघाडी विरुद्ध भाजप (Mahavikas Aghadi vs BJP) असा थेट सामना असल्यासारखी आहे. भाजपच्या देवेंद्र फडणवीसांसून ते काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्यापर्यंत सगळ्यांनी या पोटनिवडणुकीत कोल्हापूर उत्तरचा मतदारसंघ पिंजून काढलाय.
म्हणून या पोटनिवडणुकीत कुणाकुणाच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या हे समजून घेणं गरजेचं आहे. पाच सोप्या आणि महत्त्वपूर्ण मुद्द्यांमधून आपणं प्रतिष्ठेचं हे गणित समजून घेणार आहोत.
पाच सोप्या मुद्द्यांमधून समजून घ्या, कुणाची प्रतिष्ठा कशामुळे पणाला?
कोल्हापुरात जाधवांना सहानुभूती मिळणार? – काँग्रेस आमदार चंद्रकात जाधव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होतेय. कोरोनामुळे चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून उमेदवार कुणाला दिली जाणार, याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडीतीन तीनही पक्षांनी चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला उमेदवार देण्यावर एकमतानं निर्णय घेतला. हा निर्णय सोपा होता, असंही नाही. मात्र अंतर्गत ताळमेळ राखत महाविकास आघाडीनं घेतलेल्या या निर्णयाची प्रतिष्ठा सगळ्यात आधी पणाला लागलेली आहे. त्यामुळे जर निकाल दिवंगत चंद्रकांत जाधव यांची पत्नी जयश्री पाटील यांच्या बाजूने लागला, तर त्याचा संदेश हा थेट महाराष्ट्रभर ठळकपणे होणार आहे. सरकार स्थिर आहे, असाही एक समज सर्वदूर जाईल, असा तर्क जाणकारांकडून व्यक्त केला जातो. त्यामुळे महाविकास आघाडीच्या निर्णयाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
देवेंद्र फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला – गोवा विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी दणदणीत कामगिरी करुन दाखवली. पर्रीकरांना आणि गडकरींना जे जमलं नव्हतं, ते देवेंद्र फडणवीस आणि प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेच्या निवडणुकीत करुन दाखवलं होतं. बिहारपाठोपाठ गोवाही काबीज करण्यात फडणवीसांचा वाटा भाजपताच मोलाचा होता. अशात आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणायची असेल, तर नेतृत्त्व फडवीसांचंच असेल, याचीही चुणूक भाजपला या निकालातून द्यावी लागणार आहे! त्यामुळे भाजपसाठी ही पोटनिवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपली शक्ती कोल्हापुरात पणाला लावली आहे, असं म्हटलं वावगं ठरणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या दृष्टीनंही पोटनिवडणुकीची हाज-जीत फार महत्त्वपूर्ण ठरतेय.
पोटनिवडणुकीसाठी सभांच्या जोर-बैठका – या पोटनिवडणुकीसाठी भाजप असो की महाविकस आघाडी असो, सगळ्यांनी आपले हुकुमी एक्के प्रचारसभांमध्ये उतरवले होते. भाजपकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्या प्रचारसभा झाल्या होत्या. तर महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत आलटून पालटून सभा घेतल्या होत्या. यात प्रामुख्यानं जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे यांच्याही सभा झाल्या होत्या. या प्रचारसभांच्या जोर-बैठकांचा परिणाम नेमका कुणावर किती झाला, हेही पाहणं सगळ्यांसाठीच प्रतिष्ठेचं आहे. एकीकडे भाजप शिवसेनेशिवाय विधानसभा पोटनिवडणुकीच्या आखाड्यात उतरली. तर दुसरीकडे तीन पक्षांनी एकत्र येत तिहेरी ताकद प्रचारात उतरवली. या सगळ्याचा परिणाम मतदारांवर नेमका कसा झालेला आहे, याचाही अंदाज या निवडणुकीच्या निकालातून दिसून येणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं, यंदाही हार-जीत वेगवेगळ्या प्रकारे रणनिती आखण्यासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक आणि त्यांच्या सभांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
उद्धव ठाकरेंची ऑनलाईन सभा आणि ठाकरेंची प्रतिष्ठा – महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर एक रंजक बाब सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय. गेले अनेक वर्ष शिवसेना ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करत आली, त्यांच्यासोबत सत्तेत बसल्यानंतर शिवसेनेचा नेमका सूर कसा आहे, हे महाराष्ट्र बारकाईनं अनुभवतो आहे. काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही सभा झाली. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख या दोन्ही नात्यानं उद्धव ठाकरेंच्या कोल्हापुरातील सभेला विशेष महत्त्व प्राप्त होतं. या ऑनलाईन सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपचे अक्षरशः वाभाडे काढले होते. उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेले मुद्दे, त्यांनी मांडलेली भूमिका कोल्हापूरकरांना रुचते, की खटकते, यातला फरकही या निवडणूक निकालातून स्पष्ट होईल. त्यामुळे शिवसेनेचं महाविकास आघाडी सरकारमधील असलेलं स्थान, त्यांची ताकद आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्त्व याचाही कस यानिमित्तानं कोल्हापुरात पाहायला मिळणार आहे.
पाटील विरुद्ध पाटील प्रतिष्ठा – कोल्हापुरातला बालेकिल्ला म्हणून काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्याकडे जसं पाहिलं जातं. तसंच भाजपकडून कोल्हापूरचं नेतृत्त्व म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहिलं गेलं नाही, तरच नवल! त्यामुळे या दोन पाटलांचीही विशेष प्रतिष्ठा कोल्हापुरात पणाला लागलेली आहे. या पोटनिवडणुकीनं या दोन्हीही नेत्यांची ताकद वाढेल किंवा कमी होईल, असाही एक तर्क लढवला जातो आहे. अर्थात, तो खरा किपतप ठरतो, हे लवकरच स्पष्ट होईल.