काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना तिकीट देण्यात आलं. तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना मैदानात उतरवण्यात आलं. आज त्याच मतदारसंघाचा निकाल पुन्हा महाविकास आघाडीला मोठी ताकद देणारा आहे. कारण जयश्री जाधव यांनी दणदणीत विजयाची नोंद केली आहे.पहिल्या फेरीपासून काँग्रेसच्या उमेदार जयश्री जाधव आघाडीवर राहिल्या. तर सत्यजीत कदम यांना केवळ तीन फेऱ्यांमध्ये आघाडी मिळाल्याचे दिसून आले. चंद्रकांत पाटील आणि सतेज यांच्यासाठीही ही निडणूक तेवढीच महत्वाची होत. यात सतेज पाटलांनी सुरूवातीपासून लावलेली फिल्डिंग काँग्रेसच्या चांगलीच कामाला येताना दिसून आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपचा प्रचार करताना तर मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा प्रचार करतानाही या निवडणुकीत दिसून आले.