कोल्हापूर : राज्यभरात अनेक महापालिकांमधील सर्वसाधारण सभा या हाणामारी आणि बाचाबाचीने गाजल्याचं अनेकवेळा समोर आलं आहे. मात्र तिकडे कोल्हापूर महानगरपालिकेची सभा आज वेगळ्याच कारणाने गाजली. महापालिकेत एका नगरसेवकाने दुसऱ्या नगरसेवकाची चक्क भर सभागृहात करकचून पप्पी (Kolhapur corporator kissed ) घेतली. महापालिकेची सभा सुरु असताना भर सभागृहात विरोधीगटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याची पप्पी (Kolhapur corporator kissed ) घेतल्याने सर्वजण अवाक् झाले.
महानगरपालिकेत आज विरोधी गट असलेल्या ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे सत्ताधारी गटाच्या बाकावर जाऊन बसले. त्यांच्या शेजारी काँग्रेसचे गटनेते आणि स्थायी समितीचे सभापती शारगंधर देशमुख बसले होते. सभागृहाचे कामकाज सुरु झाले आणि अभिनंदनाचे ठराव सुरु असतानाच, भोपळे आणि देशमुख यांच्यात काहीतरी बोलणे झाले. त्यानंतर खुशीत असलेल्या कमलाकर भोपळे यांनी भरसभागृहात शारगंधर देशमुख यांच्या गालाची पप्पी घेतली.
पप्पी दे, पप्पी दे SSS या प्रेम वेड्याला, कोल्हापूर महापालिकेत भर सभागृहात नगरसेवकाची पप्पीhttps://t.co/nY8zGaEhta pic.twitter.com/6tVARuiQjs
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 30, 2020
अचानक झालेल्या याप्रकारामुळे सर्व सभागृहात एकच हशा पिकला. नेमकी काय चर्चा सुरु होती हे समजले नाही, मात्र सभागृहात अशा वागण्यामुळे त्याची उलटसुलट चर्चा सुरु होती. पुरुष नगरसेवकाने पुरुष नगरसेवकाची पप्पी घेतल्याने, महिला नगरसेविका मात्र गालावर हात ठेवून, लाजून चुरचूर झाल्या.
कोल्हापूरच्या महापौरांचा राजीनामा
कोल्हापूरच्या महापौर अॅड. सुरमंजिरी लाटकर यांनी राजीनामा (Kolhapur Mayor Resign) दिला आहे. महापालिकेच्या विशेष सभेत लाटकरांनी राजीनामा दिला. अवघ्या सव्वादोन महिन्यात सुरमंजिरी लाटकर पदावरुन पायउतार झाल्या आहेत. खांदेपालट होऊन कोल्हापूरचे महापौरपद आता काँग्रेसकडे जाणार आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुरमंजिरी लाटकर यांची सव्वादोन महिन्यांपूर्वी म्हणजेच 19 जानेवारी 2019 रोजी कोल्हापूरच्या महापौरपदी निवड झाली होती. लाटकर या कोल्हापूरच्या 49 व्या महापौर होत्या.
संबंधित बातम्या
कोल्हापूरच्या महापौरांचा राजीनामा, सुरमंजिरी लाटकर सव्वादोन महिन्यात पायउतार