Rajyasabha Election 2022: धनंजय महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल, अनिल बोंडे, पियुष गोयलही रिंगणात, वाचा सविस्तर…

| Updated on: May 30, 2022 | 1:05 PM

Rajyasabha Election 2022: धनंजय महाडिक यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

Rajyasabha Election 2022: धनंजय महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल, अनिल बोंडे, पियुष गोयलही रिंगणात, वाचा सविस्तर...
Follow us on

कोल्हापूर : भाजपकडून कोल्हापूरचे नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यंदाची राज्यसभा निवडणूक (Rajyasabha Election 2022) चर्चेत आहे. संभाजी राजे छत्रपतींना शिवसेनेकडून पाठिंबा न मिळल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर शिवसेनेने कोल्हापूरचेचे शिवसेनेचे नेते संजय पवार यांना उमेदवारी दिली. त्यानंतर भाजपने धनंजय महाडिकांना उमेदवारी दिली. त्यामुळे यंदाच्या राज्यसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर (Kolhapur) चांगलंच चर्चेत आहे.

अनिल बोंडेंचा उमेदवारी अर्ज दाखल

भाजपचे नेते, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  अनिल बोंडेकडे राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या काळात काही काळ राज्याचे कृषीमंत्री पद होते. शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असणारा, जमिनीवरचा नेता अशी त्यांची ओळख आहे. 2022 च्या अमरावतीच्या दंगलीत (Amravati riots)त्यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिकाही त्यांच्या साठी जमेची ठरली आहे.

पियुष गोयल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आज राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून धनंजय महाडिक, अनिल बोंडे, पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  पियूष गोयल यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

धनंजय महाडिक कोण आहेत?

2004 मध्ये धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरमधून राष्ट्रवादीचे सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेतून फारकत घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली.2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार म्हणून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. 2017, 2018 मध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना संसदरत्न पुरस्कारही मिळाला आहे.लोकसभेत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांनी 2019 च्या निवडणुकीत त्याच जागेवरून भाजपकडून निवडणूक लढवली. मात्र 2019 ची लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते संजय मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला.