सुप्रिया सुळेंशी मुंबईत भेट, भाजप नेते धनंजय महाडिक म्हणतात…

| Updated on: Jul 24, 2020 | 12:11 PM

सुप्रिया सुळे यांनी मुंबईत झालेल्या भेटीचा फोटो आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला.

सुप्रिया सुळेंशी मुंबईत भेट, भाजप नेते धनंजय महाडिक म्हणतात...
Follow us on

कोल्हापूर : भाजप नेते आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. मात्र ही भेट राजकीय नसून खासगी कामासाठी होती, असं स्पष्टीकरण महाडिक यांनी दिलं. (Kolhapur NCP Ex MP Dhananjay Mahadik meets Supriya Sule)

सुप्रिया सुळे यांनी मुंबईत झालेल्या भेटीचा फोटो आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला. फोटोसोबत त्यांनी ‘लेटपोस्ट’ असा हॅशटॅग लिहिला आहे. मात्र राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर महाडिक यांनी अचानक सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

कोल्हापूरमधून राष्ट्रवादीतर्फे खासदारकी भूषवलेल्या धनंजय महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे महाडिक राष्ट्रवादीत पुनरागमन करणार का, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

कोण आहेत धनंजय महाडिक?

धनंजय महाडिक यांनी 2004 मध्ये कोल्हापूरमधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून महाडिकांचा पराभव झाला होता.

हेही वाचा : कुठल्या बाबा-अंगाऱ्यामुळे मंत्री झाले माहित नाही, पण मंत्रिपद दोन-चार महिन्यावर टिकणार नाही : धनंजय महाडिक

त्यानंतर शिवसेनेला अलविदा करत महाडिक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

महाडिक यांना 2014 मध्ये राष्ट्रवादीने तिकीट दिले आणि त्यांनी लोकसभा गाठली. परंतु 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय सदाशिवराव मंडलिक यांनी महाडिकांना त्यांच्याच मतदारसंघात धूळ चारली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात धनंजय महाडिक यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यावेळी धनंजय महाडिक यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. (Kolhapur NCP Ex MP Dhananjay Mahadik meets Supriya Sule)