कोल्हापूर : भारतीय कुस्तीसंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात पैलवान आक्रमक झालेत. लैंगिक शोषणाचे आरोप बृजभूषण शरण सिंह यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. यावर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाष्य केलं आहे.”या प्रकरणात तक्रार दाखल झाली आहे. चौकशी सुरू आहे. न्यायपालिका निर्णय देईल तो सर्वांना मान्य करावा लागेल”, असं ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या नऊ वर्षांतील कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी @9 हा उपक्रम भाजपने हाती घेतला आहे. केंद्रातील मंत्री देशातील विविध भागात जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत. याचसाठी मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापुरात आहेत. तिथं बोलताना त्यांनी बृजभूषण शरण सिंह यांच्या बाबतच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बेरोजगारीवरही भाष्य केलं आहे. “जर्मनीसारख्या देशात सुद्धा मंदीचं सावट आहे. असं असतानाही देशात मोठी रोजगार निर्मिती होत आहे. मोठमोठे प्रकल्प देशात येत आहेत. मात्र विरोधकांना ते दिसत नाहीत. त्यांना त्यांचा चष्मा बदलण्याची गरज आहे”, असं ज्योतिरादित्य सिंधिया म्हणालेत.
लोकसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता, भाजपचं काम जमिनीपर्यंत पोहोचवणं हे सध्याचे माझं काम आहे . निवडणुकीबाबत ज्या त्यावेळी निर्णय घेतले जातील, असं ते म्हणाले.
मोदी @9 उपक्रमावरही सिंधिया बोललेत. भाजपची नवी विचारधारा आहे. सामाजिक विकास आणि व्यक्तिगत विकास करत आहे. जनधन योजनेतून सामन्याचा विकास केला जात आहे. कोविडमध्ये 220 कोटी मोफत लसीकरण केलं.असं कुठल्याच देशात झालं नाही.आमची विचारधारा ही वसुधैव कुटुंबकम आहे, असं ते म्हणाले.
कोल्हापूर क्षेत्रात आणखी विमानतळ विकसित करणार आहोत. कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाचे उद्घाटन ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात मोठ्या कार्यक्रम घेऊन करणार आहोत, असं सिंधिया म्हणाले.
3 करोड आवास योजना मोदी सरकारने राबवली. शेतकऱ्यांना 75 वर्ष्यात पाहिल्यादाचं शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हजार थेट दिले. आरोग्यासाठी आयुष्यमान 5 लाख रुपयांचा विमा दिला. महिलांसाठी 9 करोड 60 लाख महिलांना उज्वला गॅस दिला, असं सिंधिया म्हणाले.
विमान क्षेत्रात 68 वर्षीय 74 विमानतळ होते , मात्र 9 वर्षायात 74 आणखीन वाढवले. रोड ट्रेनपोर्ट मध्ये आज 300 टक्के वाढ झाली आहे. 30 वर्षात शिक्षण प्रणालीत परिवर्तन झालं नाही मात्र आम्ही नवीन पद्धती सुरू केल्या. प्रधान मंत्री योजनेत 1 कोटी 37 लाख लोकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली, असं सिंधिया यांनी सांगितलं आहे.