कोल्हापूर : कोल्हापूरमधील काही नेते हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2014 मध्ये ज्यांना भाजपमध्ये जायचं होतं ते गेलेले आहेत. आता कोणाला जायची इच्छा नाही. कोल्हापुरात जुन्या भाजपच्या नेत्यांवर नवीन लोक डोक्यावर येऊन बसले आहेत. अजून आणखी बसवणार आहेत का माहित नाही. आमच्यातले कोणीही भाजपमध्ये जाणार नाहीत. कोल्हापुरात महाविकास आघाडी एकत्र मिळून काम करत आहे. यामुळे बाहेर कोण जाईल असं वाटत नाही, असं सतेज पाटील म्हणालेत.
भाजपमध्ये गेलेल्या लोकांची परिस्थिती काय आहे हे सर्वांना दिसत आहे. प्रमुख नेत्यांना डीपीडीसीमध्ये पद दिला जात आहे. यावरून भाजप कार्यकर्त्यांचा किती सन्मान करतं, हे दिसून येत आहे. जुन्या भाजपच्या लोकांना माहित आहे की नवीन लोकांनी सर्व ताब्यात घेतला आहे. यामुळे आणखी काहींना घेऊन जुन्याना पूर्णच बाजूला जायचं आहे का?, असा सवालही त्यांनी केला आहे.
गेल्या काही वर्षात केंद्रातल्या सरकारचं दबावाचं राजकारण करत आहे. टार्गेट करून होत असलेलं राजकारण याला विरोध झाला पाहिजे. महागाईवर सरकार देशातील राजकारण वेगळ्या पद्धतीने घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. महागाई आणि बेरोजगारीवर सरकार बोलत नाही ही लोकशाही आहे आणि लोकांना न्याय देणं गरजेचं आहे. सर्वविरोधी पक्ष समर्पक अशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याचा आनंद आम्हाला आहे. आमची ही आघाडी भक्कम होईल याचा विश्वास आहे, असं सतेज पाटील म्हणालेत.
सिद्धरामय्या हे धनगर समाजाचा नेतृत्व म्हणून समोर आले आहेत. त्यांना लवकरच कोल्हापूरसाठी देखील आमंत्रित करणार आहोत, असं सतेज पाटलांनी सांगितलं.
केंद्र सरकारने कोल्हापूर विमानतळाला अद्याप छत्रपती राजाराम महाराज विमानतळ नाव देण्याचा निर्णय घेतला का माहित नाही. मात्र सिद्धारामय्या यांनी त्यांच्या दौऱ्यात कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असा उल्लेख केला याचा आम्हाला अभिमान आहे, असं म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्ध रामय्या यांचं सतेज पाटील यांनी कौतुक केलं.
शासन आपल्यादारी हा त्यांचा प्रशासकीय विषय होता. त्याला राजकीय घेण्यात काही अर्थ नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र जात आहे आणि त्यातून काहीतरी काढणं हे संयुक्तिक ठरणार नाही, असंही ते म्हणालेत.ॉ