कोल्हापूर – कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांची भूमिका काय यावरून तर्क वितर्क लढवले जात आहेत. शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलीतरी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार का ? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. प्रचाराच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी कडवट शिवसैनिक कधीही काँग्रेसला मतदान करणार नाहीत. 70 ते 80 टक्के शिवसैनिक भाजप सोबतच राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रचार सभेनंतर एका शिवसैनिकाने त्यांची भेट घेतली. शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करली आहे. हे पाहून बाळासाहेबांनाही दुःख होत असेल, असं सांगत सगळ्या शिवसैनिकांना भाजपला मतदान करायला सांगा. तुमची सगळी जबाबदारी आम्ही घेऊ असं आवाहन प्रवीण दरेकरांनी शिवसैनिकांना केलं आहे.
प्रवीण दरेकर यांची प्रचार सभा संपल्यानंतर तिथं काळ्या रंगाचा शर्ट घातलेली एक व्यक्ती येते. ती प्रवीण दरेकर यांना शिवसैनिक असल्याचे सांगत आहे. त्यावेळी प्रवीण दरेकर सुध्दा आपुलकीने कार्यकर्त्याशी संवाद साधत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. अनेक शिवसैनिक नाराज असल्याचे ती व्यक्ती दरेकरांना सांगते. त्यावर शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करली आहे. हे पाहून बाळासाहेबांनाही दुःख होत असेल म्हणतात. सगळ्या शिवसैनिकांना भाजपाला मतदान करायला सांगा. आम्ही तुमची सगळी जबाबदारी घेऊ असं आवाहन देखील प्रवीण दरेकरांनी शिवसैनिकाला दिल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते तिथं प्रचारासाठी जात आहेत. महाराष्ट्रातलं राजकारण कारवाईमुळे अधिक तापलेलं आहे. महाराष्ट्रात होत असलेल्या केंद्रीय एजन्सीच्या कारवाईवरती महाविकास आघाडी टीका करीत आहे. तर भाजप महाराष्ट्र पोलिस करीत असलेल्या कारवाईवरती टीका करीत आहेत. कॉंग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी दोन दिवसापुर्वी कोल्हापूरात बोलताना म्हणाल्या की, मला युपीतल्या उन्नाव परिसरात जायला भीती वाटली. कारण का तिथं योगीचं सरकार आहे. तसेच तिथल्या उमेदवाराला बोलता येत नाही, अशी परिस्थिती आहे. उमेदवाराला तिनशे पोलिसांची सुरक्षा देण्यात आली आहे. महाराष्ट्र तसं नाही, तुम्ही सभेला येताना, किंवा रात्र झाली म्हणून घाबरत नाही. कारण हा महाराष्ट्र आहे. इथं अशा घटना घडत नाहीत.