इंदूरमध्ये सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर कुणाल कामराचे फोटो लावले, संजय राऊत म्हणाले की,’ ये तो अपुन जैसा…

| Updated on: Mar 25, 2025 | 11:49 PM

आता मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. इंदूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक शौचालयाबाहेर कामराचा फोटो चिकटवला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरील राजकारणही तापले आहे. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी कामरा यांच्या समर्थनार्थ X वर पोस्ट केली आहे.

इंदूरमध्ये सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर कुणाल कामराचे फोटो लावले, संजय राऊत म्हणाले की, ये तो अपुन जैसा...
sanjay raut and kunal kamra
Follow us on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक पॅरीडी साँग्ज गायल्याने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या खार येथील स्टुडिओ सोमवारी सायंकाळी शिवसैनिकांनी तोडून टाकला आहे. त्यानंतर कुणाल कामरा याच्यावर विविध ठिकाणी शिवसैनिकांनी निदर्शने केली आहे. कुणाल कामरा याने तामिळनाडूतून सोशल मिडीयावर ट्वीट टाकीत आणखीन खिजवले आहेत. यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आता मध्य प्रदेशातील इंदूर शहरात सार्वजिनिक टॉयलेटवर कुणाल कामरा याचे पोस्ट लावत त्याला चपलांचा मारा केला आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेले विंडबन चर्चेत आहे. मुंबईच्या खार येथील ‘द हॅबिटॅट स्टुडिओ’ची तोडफोड केली आहे. कुणाल कामरा याच्यावर ठाणे सह अंधेरी एमआयडीसीत गुन्हे दाखल केले आहेत. कुणाल कामरा आता पाँडेचेरी येथे रहातो. त्याने तिकडूनच ट्वीटरवर आणखी पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल केले आहेत. दुसरीकडे विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात अभिव्यक्ती स्वांतत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे असे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

विनोदाच्या नावाखाली बिभत्सपणा

इंदूरच्या बंगाली चौकातील सार्वजनिक शौचालयाबाहेर शिवसेनेच्या युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी कुणाल कामरा याचा फोटो चिकटवला. मध्य प्रदेश युवा सेनेचे अध्यक्ष अनुराग सोनार म्हणाले की, कामरा विनोदाच्या नावाखाली बिभत्सपणा करत आहे. त्याने माफी मागावी असे म्हटले आहे. त्याच्या या घाणेरड्या मानसिकतेचा निषेध करण्यासाठी त्याचा पोस्टर येथे चिकटवले आहे असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशात शिवसेना कार्यकर्त्यांनी कामरा याच्या पोस्टरला काळे फासत निदर्शने केली आहेत.

येथे पाहा पोस्ट –

संजय राऊत यांचा कुणाल कामराला पाठींबा

शिवसेना (यूबीटी)चे नेते खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामरा याला पाठींबा दिला आहे. राऊत यांनी एक्सवर कामरा याच्या पोस्टला रीट्वीट करीत म्हटलेय की, “ये तो अपून जैसा निकला…ये भी झुकेगा नहीं साला!! जय महाराष्ट्र!”

कुणाल कामरा प्रकरणात काय झाले ?

महाराष्ट्रात स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केल्यानंतर सोमवारी हॉटेलात जाऊन तोडफोड करण्यात आली. बीएमसीने युनी कॉन्टीनेन्टल हॉटेलच्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम पाडले आहे.कुणाल कामरा याने माफी मागण्यास नकार दिला आहे. कुणाल यांनी पोलिसांकडे जबाब सादर करण्यासाठी एक आठवड्याची मुदत मागितली आहे.