अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, भाजपचा मंत्री अडकला; काँग्रेसकडून तक्रार

| Updated on: Feb 07, 2024 | 8:08 PM

गोव्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवं वादळ उभं राहिलं आहे. गोव्याच्या विधानसभा अध्यक्षांनी आपल्याच सरकारचे कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गौडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे आरोप करून अध्यक्षांनी एकच खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतच कोलित मिळालं होतं. हा वाद थांबत नाही तोच पुन्हा एकदा गौडे नव्या वादात अडकले आहेत.

अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, भाजपचा मंत्री अडकला; काँग्रेसकडून तक्रार
minister govind gaude
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

पणजी | 7 फेब्रुवारी 2024 : आधीच भ्रष्टाचाराच्या आरोपाने गोत्यात आलेले गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गौडे यांच्या अडणीत आणखी भर पडली आहे. गोव्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष रमेश तवाडकर यांनीच कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गौडे यांच्यावर फंडाचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाच्या चौकशीची त्यांनी मागणीही केली होती. हे टेन्शन असतानाच गौडे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांना धमकावल्या प्रकरणी काँग्रेसने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गोविंद गौडे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची कथित धमकी दिली होती. त्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदिवासी सेलचे अध्यक्ष रामकृष्ण जाल्मी यांनी लेखी तक्रार दिली आहे. गौडे आणि अनुसूचित जमाती कल्याण विभागाचे संचालकाच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात गौडे हे अधिकाऱ्यांना धमकावत आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये गौडे हे एससी, एसटी आयोगाच्या अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. काँग्रेसच्या तक्रार पत्रात याचा उल्लेख आहे. गोव्याचे मंत्री एससी, एसटी आयोगाच्या अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. आणि मुख्यमंत्री मात्र शांत आहेत, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये काय?

काँग्रेस नेते जाल्मी यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही पोलिसांना तक्रार दिली आहे. या प्रकरणाची चौकसी करण्याची तसेच ऑडिओ क्लिपचीही चौकशी करण्याची मागणी आम्ही पोलिसांना केली आहे. तसेच या प्रकरणी भादंविच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचीही आम्ही मागणी केली आहे, असं जाल्मी म्हणाले. गौडे आणि डायरेक्टर ऑफ ट्रायबल वेल्फेअरचे संचालक दशरथ रेडकर यांच्या दरम्यानच्या संवादाची एक क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये गौडे हे कथितरित्या एससी, एसटी आयोगाच्या जागरूकतेसाठी काही निधी देण्यासाठी रेडकर यांना धमकावत आहेत. या जनजागृती कार्यक्रमात सोशलली एंगेज्ड व्हॉलिंटर्स असोसिएशन (SEVA)चा समावेश करण्यात आल्याबद्दलही गौडे हे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत.

त्यांना निक्षून सांगा…

‘सेवे’चा हेतू काय आहे? ते कोणत्या प्रकारची सेवा देतील? हा कार्यक्रम कुठे होतोय? त्याबद्दलची तुम्हाला माहिती आहे काय? हा कार्यक्रम होऊ नये आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये. जा आणि मुख्यमंत्र्यांना सांगा. हे मी तुम्हाला सांगत आहे. मी तुम्हाला थेट सांगतोय, तुम्ही माझ्या मतदारसंघात कार्यक्रम आयोजित करत आहात आणि मला सरपंचासह निमंत्रित केलेले नाही. मी तुम्हाला राजकारण शिकवावे असे तुम्हाला वाटते का? हा कार्यक्रम करूच नका, असं मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर (वक्ते) यांना निक्षून सांगा, असं गौडे बोलताना ऐकायला मिळतं.