मुंबई: देशभरात सध्या निवडणुकांचं वारं वाहात आहे. युती आणि आघाडीच्या चर्चेच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसने प्रियांका गांधी यांना सक्रीय राजकारणात उतरवलं आहे. तर भाजपनेही लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक एजन्सीचे सर्व्हे, ओपिनियन पोल जाहीर होत आहेत. या वर्षातील सर्वात ताजा ओपिनियन पोल व्हीडीपी असोसिएशनने केला आहे.
या ओपिनियन पोलमधील आकडे भाजपला धक्का देणारे आहेत. कारण 2014 च्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजपला या निवडणुकीत तशीच कामगिरी करता येणार नाही, असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
आकड्यातच बोलायचं झाल्यास, गेल्या निवडणुकीत 282 जागा मिळवणाऱ्या भाजपला यंदा थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 81 जागांचा फटका बसेल असा अंदाज व्हीडीपी असोसिएशनने वर्तवला आहे. म्हणजेच भाजपला 201 जागा मिळू शकतात, त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला 271 हा आकडा गाठण्यासाठी भाजपला शिवसेनेसह मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
महाराष्ट्रात फडणवीस मॅजिक कायम
व्हीडीपी असोसिएशनच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जादू कायम असल्याचं दिसतंय. कारण महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी तब्बल 23 जागा भाजप जिंकेल असा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. युतीशिवाय भाजपला या जागा मिळतील असा अंदाज आहे. दुसरीकडे या निवडणुकीत सर्वात मोठा फटका शिवसेनेला बसेल असा अंदाज आहे. कारण गेल्यावेळी तब्बल 18 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला केवळ दोन जागा मिळतील असा अंदाज आहे.
व्हीडीपी असोसिएशनच्या सर्व्हे
देशात लोकसभेच्या कुणाला किती जागा मिळतील ?
एकूण जागा- 542
एनडीए- 225
यूपीए – 167
इतर – 150
देशात लोकसभेच्या कुणाला किती जागा मिळतील?
भाजपा- 201 (-81)
काँग्रेस – 110 (+66)
इतर – 231
महाराष्ट्रात कुणाला किती जागा?
भाजप – 23
काँग्रेस – 12
राष्ट्रवादी – 08
शिवसेना – 2
इतर – 3
Maharashtra Seat Share Forecast(48 Seats) #NationalTrackerPoll
BJP-23
Cong-12
NCP-8
Shiv Sena-2
Others-3— VDPAssociates (@VDPAssociates) January 5, 2019
दक्षिण भारतात कुणाला किती जागा ? ............................... एकूण जागा- 130 एनडीए- 12 यूपीए - 61 इतर - 57 दक्षिण भारतात कशी राहिल मतांची टक्केवारी ? ................... एनडीए- 17 % यूपीए- 41 % इतर - 38 % ********** पश्चिम भारतात कशी असेल मतांची टक्केवारी ? ........................... एकूण जागा- 104 एनडीए - 44% यूपीए - 40 % इतर - 11 % .............................. पश्चिम भारतात कुणाला किती जागा मिळतील? ................... एकूण जागा- 104 एनडीए- 58 यूपीए- 44 इतर- 02 पश्चिम भारतातली राज्य आणि लोकसभेच्या जागा .......... महाराष्ट्र- 48 गुजरात- 26 राजस्थान - 25 ....................... महाराष्ट्रात लोकसभेच्या कुणाला किती जागा ? .............................. भाजपा- 23 काँग्रेस - 12 राष्ट्रवादी- 8 शिवसेना- 02 इतर- 03 महाराष्ट्रात मतांची टक्केवारी कशी असेल ? ............................................ भाजपा- 40 % काँग्रेस - 20.5 % राष्ट्रवादी - 17 % शिवसेना- 9.8 % एमआयएम- 2 % मनसे- 1.9 % बीएसपी- 1.8 % गुजरातमध्ये कुणाला किती जागा मिळतील? ......................... एकूण जागा- 26 भाजपा- 020 काँग्रेस- 06 राजस्थानमध्ये कुणाला किती जागा ? एकूण - 25 भाजपा- 12 काँग्रेस - 13