मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या वाट्याच्या लोकसभा मतदारसंघाच्या जागा निश्चित करण्यासाठी बैठकांचं सत्र सुरु केलं आहे. काल पहिली बैठक पार पडल्यानंतर आजही बैठक सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय निश्चित केला आहे. त्यामुळे 48 जागांपैकी 40 जागांचा प्रश्न सुटला आहे. उर्वरित 8 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीत घमासान सुरु आहे. यामध्ये अहमदनगरच्या जागेचा तिढा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांनी नगरच्या जागेवर दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आजच्या बैठकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी तीन नावंही निश्चित केली आहेत. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. यामध्ये –
काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये सहा जागांचा पेच आहे. त्यामध्ये अहमदनगर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नंदूरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या जागांचा समावेश आहे.
अहमदनगरसाठी काँग्रेस इच्छुक
अहमदनगरची जागा सध्या राष्ट्रवादीकडे असली तरी तिथे विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पारंपारिक मतदारसंघ असल्याने राष्ट्रवादीही या जागेसाठी आग्रही आहे.
आई-वडील काँग्रेसमध्ये, म्हणून काय झालं? मी थांबणार नाही : सुजय विखे पाटील
दरम्यान, सुजय विखे पाटील हे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदार संघातून लढण्यासाठी उत्सुक आहेत. गेल्या काही दिवासांपासून दक्षिण अहमदनगरमध्ये लोकसभेच्या या जागेबाबत चर्चा सुरु आहेत. सुजय विखे इथून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, दक्षिण अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे आघाडी झाल्यास, या जागेवर राष्ट्रवादी दावा करेल, हे ओघाने आलेच. मात्र, सुजय विखेंना लढायचं असल्यास, ही जागा काँग्रेसच्या खात्यात असणे आवश्यक असेल. मात्र, सुजय विखेंसाठी राष्ट्रवादी ही जागा सोडेल का, हा प्रश्नच आहे.
गेल्यावेळी म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण अहमदनगरमधून राष्ट्रवादीकडून राजीव राजळे लढले होते. राजीव राजळे यांचे गेल्या वर्षी निधन झाले. सध्या भाजपचे दिलीप गांधी हे या जागेवरुन विद्यमान खासदार आहेत.
सुजय विखे पाटील यांनी राजकीय प्रवेशाची जोरदार तयारी केलीय. मात्र, सुरुवात काँग्रेसमधून करणार की, भाजपची वाट धरणार, की आणखी कोणत्या पक्षाची निवड करतात, याबाबत संदिग्धतात कायम आहे. कारण काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रसंगी काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याबाबतही संकेत दिले होते.
लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार
संबंधित बातम्या
त्या 6 जागा, जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकण्याची पूर्ण हमी!
लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित