मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानानंतर निकालापूर्वीचा अंदाज अर्थात एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. देशातील विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी देशात पुन्हा मोदी सरकारच येणार असा अंदाज वर्तवला आहे. टीव्ही 9 सी व्होटरच्या सर्वात विश्वसनीय एग्झिट पोलनेही हाच अंदाज वर्तवला आहे. TV9 C voter exit poll नुसार महाराष्ट्रात भाजपला 19, शिवसेनेला 15, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील असा अंदाज टीव्ही 9 सी व्होटरने व्यक्त केला आहे.
टीव्ही 9 सी व्होटरच्या सर्वात विश्वसनीय एग्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. देशातील सर्वात विश्वसनीय एक्झिट पोल म्हणून याकडे पाहिलं जातं. या एग्झिट पोलनुसार महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागांमध्ये चौपट वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ 2 जागा मिळाल्या होत्या, यंदा काँग्रेसला 8 जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेसने यंदा 26 तर राष्ट्रवादीने 22 जागा लढल्या आहेत. त्यांनी मित्रपक्षांना आपआपल्या कोट्यातील 2-2 जागा सोडल्या. त्यानुसार काँग्रेसला 26 पैकी 8 जागी विजय मिळेल असा अंदाज TV9 C voter exit poll चा आहे.
एग्झिट पोल | भाजप + | काँग्रेस + | इतर |
---|---|---|---|
टीव्ही 9-सी व्होटर | 287 | 128 | 127 |
टाईम्स नाऊ –VMR | 306 | 132 | 104 |
एबीपी-नेल्सन | 267 | 127 | 148 |
न्यूज 24 – टुडेज चाणक्य | 340 | 70 | 133 |
न्यूज नेशन | 282-290 | 111-126 | 130-138 |
न्यूज 18- IPSOS | 336 | 82 | 124 |
इंडिया न्यूज –पोल स्ट्रॅट | 287 | 128 | 127 |
न्यूज एक्स | 242 | 164 | 136 |
रिपब्लिक – जन की बात | 305 | 124 | 87 |
महाराष्ट्रात कुणी किती जागा दिल्या?
एग्झिट पोल | भाजप+ | काँग्रेस+ | इतर |
---|---|---|---|
टीव्ही 9-सी व्होटर | 34 | 14 | 00 |
टाईम्स नाऊ –VMR | 38 | 10 | 00 |
एबीपी-नेल्सन | 34 | 13 | 01 |
न्यूज 24 – टुडेज चाणक्य | 38 | 10 | 00 |
न्यूज नेशन | 33-35 | 13-15 | 00 |
न्यूज 18- IPSOS | 41-45 | 3-6 | 01 |
इंडिया न्यूज –पोल स्ट्रॅट | 34 | 14 | 00 |
न्यूज एक्स | 36 | 11 | 01 |
रिपब्लिक – जन की बात | 34-39 | 8-12 | 01 |
संबंधित बातम्या
Tv9 C Voter exit poll Maharashtra : महाराष्ट्रात युतीला 34 जागा
Tv9-C Voter Exit Poll : देशात मोदींना बहुमत, काँग्रेस 100 च्या आत!
Tv9-C Voter Exit Poll : देशात पुन्हा मोदी सरकार येण्याची शक्यता – राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव