मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) उज्जैनचे खासदार अनिल फिरोजीया (Anil Firojia) हे तब्बल 32 हजार कोटीचे खासदार झाले असल्याचा चर्चा रंगल्यात आहे. ही चर्चा रंगण्यामागे एक खास कारणही आहे. या कारणामागे नितीन गडकरी कनेक्शन देखील जोडलेलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिलेलं चॅलेंज अनिल फिरोजीया यांनी इतकं मनावर घेतलं की, त्यामुळे फिरोजीया यांनी स्वतःचं वजन कमी करत आपल्या खासदारकीची ताकद वाढवलीय.
नितीन गडकरी यांनी फिरोजीया यांना वजन कमी करण्याचं आव्हान दिलं होतं. जेवढे किलो वजन कमी कराल, त्याच्या प्रति किलो एक हजार कोटी रुपयांचा विकास निधी मतदारसंघाला देईन, असं आव्हान गडकरींनी दिलं होतं. फेब्रुवारी 2022 मध्ये गडकरींनी दिलेलं हे आव्हान स्वीकारत अनिल फिरोजीया यांनी जी कामगिरी करुन दाखवली आहे, तिची तुफान चर्चा रंगलीय.
फेब्रुवारी महिन्यात अनिल फिरोजीया यांना गडकरींनी एका भर कार्यक्रमात चॅलेंज दिलं. वजन जितके किलो कमी कराल, तितके हजार कोटी रुपयांचा विकास निधी देण्याचं गडकरींनी कबुल केलं. फिरोजीया यांनी आपल्या वजनावर प्रचंड मेहनत घेतली. आतापर्यंत तब्बल 32 किलो वजन त्यांनी करुन दाखवलंय. यानंतर गडकरींनी आपला दिलेला शब्द खरा करुन दाखवला.
जून महिन्यापर्यंत फिरोजीया यांनी 15 किलो वज कमी केलं होतं. पण त्यानंतरही ते थांबले नाही. त्यांनी व्यायाम आणि आहारातील सातत्य राखलं. अखेर आता त्यांनी आणखी 17 किलो वजन घटवलंय. फेब्रुवारी महिन्यात 130 किलो वज असणाऱ्या अनिल फिरोजिया यांचं वजन आता 100च्याही खाली आलंय.
Madhya Pradesh | I accepted the challenge and I have lost almost 32 kgs. I met Union Minister Nitin Gadkari and told him and he was very happy to know about it. As promised, he has approved development plans worth Rs 2,300 crores for the region: Ujjain MP Anil Firojiya (17.10) https://t.co/0Xxv3P0rgo pic.twitter.com/CJe0BOpsvv
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) October 17, 2022
नितीन गडकरी यांनीही अनिल फिरोजीया यांचं कौतुक केलंय. फिरोजीया यांनी आपल्या वजनाबाबत घेतलेल्या मेहनतीची गडकरींनी तारीफ केलीय. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अनिल फिरोजीया यांच्या उज्जैन लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत 23 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिलीय. सध्या अनिल फिरोजी यांचं वजन 98 किलो इतकं आहे. आणखीही काही निधी आता गडकरींना द्यावा लागणार आहे.
उज्जैनच्या विकासासाठी गडकरींनी दिलेलं चॅलेंज स्वीकारल्याचं अनिल फिरोजीया यांनी म्हटलं. सुरुवातीला हे आव्हान पूर्ण कसं करायचं, असा प्रश्नही फिरोजीया यांना पडला होता. पण पत्नी आणि मुलीने त्यांना सहकार्य केलं. त्यांचा आहार, व्यायाम यासाठी सातत्यानं त्यांना प्रोत्साहित केलं. त्यामुळेच ते इतक्या कमी काळात 32 किलो वज कमी करु शकलेत.
गडकरींकडून विकासनिधी मुळाल्यामुळे आता उज्जैनमध्ये फोलरेल हायवे आणि रोपवे प्रकल्पलाही मंजुरी मिळवण्यात आली आहे. त्यासाठी जमीन ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलीय. 11 ऑक्योबर रोजी उज्जैनमध्ये नरेंद्र मोदी यांनीही अनिल फिरोजीया यांनी आपल्या वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक केलं होतं.