मुंबई: आघाडीतील कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ही समिती काम करेल. ही समिती एकमेकांना विश्वासात घेऊनच कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (maha vikas aghadi form coordination committee, patole, patil, desai oppointed as member of committee)
एकमेकांचे कार्यकर्ते फोडले जात असल्याने आघाडीत नाराजी होती. काही नेत्यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली होती. त्यामुळे एकमेकांचे कार्यकर्ते न फोडण्याचं ठरलं होतं. मात्र, हा गोंधळ अधिक वाढू नये म्हणून अखेर तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश असलेली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे.
शिवसेना नेते सुभाष देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या समितीत असणार आहेत. हे तिन्ही नेते शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षात कार्यकर्त्यांना प्रवेश देतांना एकमेकांना विश्वासात घेणार आहेत. एकमेकांना विश्वासात घेऊनच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं होतं. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून फोडाफोडी केली जात असल्याचा आरोप केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचा तुम्ही शब्द दिला होता. तो पूर्ण करून दाखवला. तुम्ही पदाला न्यायही देत आहात. पण या परिस्थितीही राजकारण सुरू आहे. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहे. आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे निदान प्रताप सरनाईक. अनिल परब आणि रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास थांबेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, असंही सरनाईक यांनी म्हटलं होतं.
तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी मिळाली आहे, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय, असं सांगितलं होतं. सरकार स्थापन होत असताना असा काही करार झालाय का एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत, वगैरे, असा प्रश्न हसन मुश्रीफ यांना विचारण्यात आला. त्यावर मुश्रीफ म्हणाले, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कार्यकर्ते आम्ही फोडतोच, त्यासाठी आम्हाला फुल्ल परवानगी आहे. परंतु शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे.” वरिष्ठ नेत्यांनीच ही विधाने केल्याने ही समिती स्थापन केली असावी असं सांगितलं जात आहे. (maha vikas aghadi form coordination committee, patole, patil, desai oppointed as member of committee)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 12 July 2021 https://t.co/KaFtfP4IhJ #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2021
संबंधित बातम्या:
काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करतेय, भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब
अखेर नारायण राणेंचा फोन लागला; राज ठाकरेंनी मंत्रिपदासाठी दिल्या शुभेच्छा
(maha vikas aghadi form coordination committee, patole, patil, desai oppointed as member of committee)