युतीत आहे की नाही माहिती नाही, म्हणून 288 जागा लढविणार, जानकर यांची घोषणा

| Updated on: Sep 11, 2024 | 8:23 PM

लोकसभा निवडणूकीच्या वेळी शरद पवार यांना हात दाखवून महायुतीच्या तंबूत गेलेल्या महादेव जानकर यांनी विधानसभेच्या सर्वच्या सर्व 288 जागा लढविण्याचा निर्धार केला आहे.

युतीत आहे की नाही माहिती नाही, म्हणून 288 जागा लढविणार, जानकर यांची घोषणा
Follow us on

आम्ही महायुतीत आहे की नाही, हेच माहीत नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपापली तयारी केली पाहिजेत म्हणून आम्ही येत्या विधानसभेला महाराष्ट्रातील 288 जागा लढविणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज जाहीर केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा अकोला येथे वर्धापन दिन झाला. त्यात प्रदेशाध्यक्षांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. प्रत्येकानं आपापली तयारी केली पाहिजे. रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही. आपण किती दिवस एखाद्याच्या आश्रयाखाली राहायचं? त्यापेक्षा आपली आपली तयारी केली पाहिजे, असंही महादेव जानकर म्हणाले आहेत.

येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष 288  जागा लढवणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली आहे. आम्ही महायुतीत आहे की नाही हेच आम्हाला माहीत नसून त्यामुळे प्रत्येकाने आपापली तयारी केली पाहिजे,अशीही मासलेवाईक प्रतिक्रिया जानकरांनी दिली आहे.महादेव जानकर लोकसभा निवडणूकीच्या वेळी शरद पवार यांच्याशी तिकीटासाठी चर्चा करीत असताना अचानक महायुतीत सामील झाले होते. परभणीमधून त्यांचा पराभव झाला आहे. हरल्यानंतर त्यांनी आपण पुढची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदार संघातून लढविणार असल्याचे जाहीर केले होते.

बावनकुळे यांच्या मुलाचा राजकीय इव्हेंट योग्य नाही

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या कार अपघाताप्रकरणाबाबत विचारलं असता, या प्रकरणात एफआयआर झाला असून प्रत्येकाकडून चूक होत असते, मात्र त्याचा पॉलिटिकल इव्हेंट करणं योग्य नाही, असं महादेव जानकर म्हणाले. याचा अर्थ मी बावनकुळे यांची बाजू घेतोय, असं नसून उद्या उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याही घरात काही घटना घडली, तरीही त्यावेळी सुद्धा अशा घटनांचा राजकीय इव्हेंट करणं योग्य नसल्याची महादेव जानकर यावेळी म्हणाले.