औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजी समोर आली होती. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचं राजीनामासत्रही सुरु झालं होतं. मात्र, पंकजा मुंडे यांनी त्याना राजीनामे परत घेण्याचं आवाहन केल्यानंतर हे राजीनामा सत्र थांबलं. मात्र, त्यावेळी महाराष्ट्र भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधकांना इशारा दिला आहे. जानकर आज औरंगाबादेत बोलत होते. (Mahadev Jankar’s warning to Pankaja Munde’s opponents)
पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे. तिच्यावर काही अन्याय झाला असेल तर माझ्या बहिणीनं मला सांगावं मग बघू, असा इशाराच महादेव जानकर यांनी दिला आहे. त्याचबरोबर मराठवाड्याचं वॉटर ग्रीड भगवानगडावर व्हावं. असं झाल्यास मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल, असं मत जानकर यांनी व्यक्त केलं आहे. एमपीएससी बिंदू नामावलीच्या नावाखाली धनगर, वंजारी यांना नेहमीच डावल्याचा प्रयत्न केला जातो. या विषयी एमपीएससीनं लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणीही महादेव जानकर यांनी केली आहे.
ओबीसी समाजाच्या जनगणनेसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून स्वत: या कमिटीचं प्रमुख व्हावं आणि ओबीसींची डेटा तयार करावा, अशी मागणीही महादेव जानकर यांनी केलीय. ओबीसी समाजासाठी राष्ट्रीय समाज पक्ष 29 ऑगस्टनंतर मुंबईतून जनजागृती अभियान सुरु करणार असल्याचंही जानकर म्हणाले. ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही जानकर यांनी मांडली आहे. केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारनं इम्पिरिकल डेटा तयार करावा, असंही जानकर यांनी म्हटलंय.
राष्ट्रीय समाज पार्टी हा फुले, शाहू आणि आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे. आमची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसोबत आहे, असं सांगतानाच रासपचे 50 आमदार निवडून आल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली. जानकर यानी सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आम्ही औरंगाबाद महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी आम्ही पक्ष संघटना वाढवण्यावर भर देणार आहोत. औरंगाबाद महापालिकेच्या सर्व प्रभागात रासपचे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत, असं जानकर म्हणाले. रासप पक्ष वाढत आहे. रासप राष्ट्रीय पक्ष व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Video | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 9 August 2021#MahaFastNews | #News | #NewsUpdatehttps://t.co/V2UUEFJvbe
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 9, 2021
संबंधित बातम्या :
ओबीसींच्या आरक्षणासाठी आता महादेव जानकर मैदानात; रविवारी राज्यभरात चक्काजाम
महादेव जानकर म्हणतात, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो!, पण अट काय?; वाचा
Mahadev Jankar’s warning to Pankaja Munde’s opponents