Mahamorcha: महाराष्ट्राच्या मानसिकतेला डिवचण्याचा प्रयत्न हाेताेय- पृथ्वीराज चव्हाण

| Updated on: Dec 17, 2022 | 12:45 PM

मविआकडून महामाेर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपआपल्या पातळीवर या महामोर्चाची जोरदार तयारी  केली आहे.

Mahamorcha: महाराष्ट्राच्या मानसिकतेला डिवचण्याचा प्रयत्न हाेताेय- पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  आज महाविकास आघाडिच्या महामाेर्चाला (Mahamorcha) सुरूवात हाेणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavhan) यांनी टिव्ही 9 मराठीसाेबत विशेष बातचीत केली. महापुरुषांबद्दल केले जाणारे विवादास्पद वक्तव्य हे जाणीवपुर्वक केले जात आहेत, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. गेल्या कित्येक वर्षांपासुन सिमावादाचा प्रश्न प्रलंबित आहे, मात्र दाेनही राज्यात भाजपाच्या विचाराचे सरकार असतानाच या मुद्दयाला चालना मिळणे हा केवळ याेगायाेग नाही असेही पृथ्विराज चव्हाण म्हणाले. संविधानिक पदावरील राज्यपाल असाे किंवा इतर नेते असाे हे सर्व पुर्वनियाेजीत पणे वादग्रस्त विधान करत असल्याचा आराेप त्यांंनी केला.

तीन मुद्दयांसाठी निघताेयं माेर्चा

महाविकास आघाडीच्या माेर्चाचे तीन महत्वाचे मुद्दे आहेत. त्यापैकी पहिला मुद्दा महापुरूषांचा अपमान, दुसरा मुद्दा महाराष्ट्र- कर्नाटक सिमावाद आणि तीसरा मुद्दा महागाई आणि बेराेजगारीचा आहे.

महाविकास आघाडीच्या आज हाेणाऱ्या माेर्चाला विक्रमी उपस्तिथी राहणार असल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. ठिकठीकाणी बॅनर आणि फ्लेक्स लावण्यात आले आहेत.  हिवाळी अधिवेशनाच्या ताेंडावर निघणाऱ्या या माेर्चाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

हे सुद्धा वाचा

माेर्चासाठी महाविकास आघाडिची जय्यत तयारी


मविआकडून महामाेर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपआपल्या पातळीवर या महामोर्चाची जोरदार तयारी  केली आहे. या महामोर्चासाठी बसेस भरून भरून लोकं आलेले आहेत. जवळपास दीड लाख लोकं या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीचा हा महामोर्चा ऐतिहासिक ठरणार असून या महामोर्चाच्या माध्यमातून आघाडीकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या महामोर्चाकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचंही लक्ष लागलं आहे.