मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्वपक्षीय बैठक (Maharashtra all party meeting) बोलावली आहे. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंदर्भात (Maharashtra lockdown) या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत (Maharashtra all party meeting CM Uddhav Thackeray 10 most important points from meeting).
कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधान मोदींसमोर मांडला होता. सध्या कोरोनाची साखळी तोडणं आणि आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. कालच निर्णय झाला असता पण देवेंद्रजी आपण नव्हता म्हणून आजची ही बैठक बोलावली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच उद्योगांबाबत बोलताना लोकांचं येणं जाणं कमी केलं पाहिजे. कार्यालयाच्या वेळा बदला, घरातून काम करण्याचं नियोजन करा, पीक आवर ही संकल्पना आता बदलायला हवी, असं मतही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केलं आहे.
(Maharashtra all party meeting CM Uddhav Thackeray 10 most important points from meeting)
… तर कोरोनावर महिन्याभरात नियंत्रण मिळवू शकू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पूर्ण लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल; देवेंद्र फडणवीसांचा इशारा#coronavirus #devendrafadanvis #uddhavthackeray #coronawavehttps://t.co/9xLYQl6l43
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 10, 2021