VIDEO: तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाही, महाराष्ट्रातही आहेत; संजय राऊतांचा सूचक इशारा

| Updated on: Mar 01, 2022 | 10:48 AM

केंद्र सरकारकडून कारवाईची कोणतीही अपेक्षा नाही. केंद्र सरकारमधल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरु आहेत. खासकरुन महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या कारवाया सुरू आहेत.

VIDEO: तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाही, महाराष्ट्रातही आहेत; संजय राऊतांचा सूचक इशारा
तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाही, महाराष्ट्रातही आहेत; संजय राऊतांचा सूचक इशारा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून कारवाईची कोणतीही अपेक्षा नाही. केंद्र सरकारमधल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरु आहेत. खासकरुन महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या कारवाया सुरू आहेत. त्यातही महाराष्ट्रात (maharashtra) जरा जास्तच सुरू आहे. जे चिखल फेकत आहे, त्यांचे हातसुद्धा किती बरबटलेले आहेत, ते सुद्धा देशाला कळायला हवं. त्यामुळेच पंतप्रधान कार्यालयात मी काही पुरावे दिले आहेत. हा एक रेकॉर्ड आहे, आम्ही तुम्हाला कळवल्याचा. पण तुम्ही काहीच काम करत नाही. मुंबई महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणा यावर काम करतीलच. पण केंद्रातल्या यंत्रणा काय करत आहेत, हे देखील यानिमित्तानं कळेल, असं सांगतानाच तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाहीत. त्या महाराष्ट्रातही आहेत, असा सूचक इशारा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी भाजपला (bjp) दिला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे.

भाजपच्या दोन-पाच लोकांना हाताशी पकडून कशा प्रकारे एक क्रिमिनिल सिंडिकेट चालवत आहेत याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला पोहोचवणं हे संसदेचा सदस्य आणि शिवसैनिक म्हणून देणं हे माझं कर्तव्य आहे. त्यानुसार मी माहिती दिली आहे. अशी माहिती मी वारंवार देत जाईल. यानंतर मुंबईत येऊन याबाबत पत्रकार परिषद घेईल, असंही त्यांनी सांगितलं.

तपासातून सर्व बाहेर येईल

यावेळी त्यांनी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. आमच्या सगळ्यांचे फोटो टॅप केलेत. त्यातून त्यांना काय साध्य करायचं होतं. हे हळूहळू तपासातून बाहेर येईलच. तपास यंत्रणा महाराष्ट्रात सुद्धा आहेत, फक्त केंद्रातच नाहीत, असं सांगतानाच महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये जाणीवपूर्वक कारवाया केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

‘आई कुठे काय करते’च्या सासू-सुनेचा धमाकेदार परफॉर्मन्स; अरुंधती-अनघाची जोरदार तयार