[svt-event title=”जळगावात शिवसेनेचा जिल्हाप्रमुख राष्ट्रवादीचा उमेदवार?” date=”07/10/2019,3:18PM” class=”svt-cd-green” ] जळगाव – अपक्ष अर्ज भरलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार ठरण्याची शक्यता, राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळण्याची चिन्हं, एकनाथ खडसेंच्या मुलीविरोधात लढत [/svt-event]
[svt-event title=”बाळा भेगडेंना मोठा दिलासा” date=”07/10/2019,10:27AM” class=”svt-cd-green” ] मावळ विधानसभा मतदारसंघात राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे विरोधात अपक्ष अर्ज दाखल करणारे भाजपचे नेते रवींद्र भेगडे यांनी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. [/svt-event]
[svt-event title=”नाशिकमध्ये बाळासाहेब सानप यांची बंडखोरी” date=”07/10/2019,10:22AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये तिकीट कापलेले भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांची बंडखोरी, भाजप उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार [/svt-event]
[svt-event title=”अमित शाहांची 11 तारखेला नागपुरात सभा” date=”07/10/2019,10:02AM” class=”svt-cd-green” ] शुक्रवारी ११ तारखेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची नागपूर जिल्हयात प्रचार सभा, भाजपचे उमेदवार राजीव पोतदार यांच्या प्रचारासाठी विजय संकल्प सभेचं आयोजन, सावनेर मतदारसंघातील खापरखेडा येथे होणार सभा, सभेला नागपूर ग्रामीणमधील सहा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि कार्यकर्ते येणार [/svt-event]
[svt-event title=”मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर राष्ट्रवादीत” date=”07/10/2019,9:40AM” class=”svt-cd-green” ] मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर राष्ट्रवादीत प्रवेश करणार,- संजीव भोर हे कोपर्डी अत्याचाराविरोधातील पहिले आंदोलक, मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्रातील अनेक सहकाऱ्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश करणार [/svt-event]
[svt-event title=”उद्धव ठाकरेंची पिंपरीत सभा” date=”07/10/2019,9:33AM” class=”svt-cd-green” ] उद्धव ठाकरे यांची 9 तारखेला पिंपरीत प्रचारसभा, 9 तारखेला उद्धव ठाकरे प्रचाराचा नारळ फोडणार, सेना उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ सभा, त्यादिवशीच राज ठाकरे यांची पुण्यात सभा [/svt-event]
[svt-event title=”नागपूर : रामटेक विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आशिष जैसवाल यांच्या मनधरणीचे सेनेकडून प्रयत्न, अपक्ष निवडणूक लढवण्यावर आशिष जैसवाल ठाम, आज उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस” date=”07/10/2019,9:33AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : रामटेक विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आशिष जैसवाल यांच्या मनधरणीचे सेनेकडून प्रयत्न, अपक्ष निवडणूक लढवण्यावर आशिष जैसवाल ठाम, आज उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस [/svt-event]
[svt-event title=”जय पवार प्रचाराच्या मैदानात” date=”07/10/2019,9:33AM” class=”svt-cd-green” ] बारामती : पवार कुटुंबियांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. शरद पवार यांना नाहक गोवलं जातंय. पवारांना राजकीय महत्व असल्यानं सत्ताधारी खेळी करत आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी केला. राजकारणात येणार, पण निवडणूक लढवणार नाही. पक्षातलं पद घेवून जनतेची सेवा करण्याची इच्छा, असं जय पवार म्हणाले. अजित पवार यांच्या प्रचारार्थ जय पवार मैदानात उतरले आहेत. बारामती शहरातून पदयात्रा काढून प्रचाराला सुरुवात केली. [/svt-event]