Kolhapur district Assembly constituencies कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. दोन्हीही जागा यंदा शिवसेनेने जिंकल्या. तर कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 10 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये त्यापैकी 6 शिवसेनेकडे, 2 भाजपकडे आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या. म्हणजे मोदींनी घोषणा केल्याप्रमाणं कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसमुक्त झाला. कोल्हापूर महापालिका सोडली तर सर्वच ठिकाणी शिवसेना-भाजपनं सत्ता स्थापन केली.
2019 म्हणजेच यंदाच्या निकालात कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड उलटफेर पाहायला मिळाले. कारण शिवसेनेने 6 पैकी 5 जागा गमावल्या.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
विधानसभा मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | अपक्ष/इतर | विजयी उमेदवार |
---|---|---|---|---|
कागल विधानसभा | संजयबाबा घाटगे (शिवसेना) | हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) | समरजित घाटगे(अपक्ष) भाजपचे, बंडखोर | हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) |
चंदगड विधानसभा | संग्राम कुपेकर (शिवसेना) | राजेश पाटील (राष्ट्रवादी) | शिवाजी पाटील(अपक्ष) भाजपचे, बंडखोर | राजेश पाटील (राष्ट्रवादी) |
शिरोळ विधानसभा | उल्हास पाटील,(शिवसेना) | सावकार मदनाईक,(स्वाभिमानी शेतकरी संघटना) | राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष) राष्ट्रवादीचे बंडखोर | राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष) |
करवीर विधानसभा | चंद्रदीप नरके (शिवसेना) | पी एन पाटील (काँग्रेस) | पी एन पाटील (काँग्रेस) | |
राधानगरी विधानसभा | प्रकाश आबीटकर (शिवसेना) | के पी पाटील (राष्ट्रवादी | राहुल देसाई (अपक्ष)भाजप बंडखोर | प्रकाश आबीटकर (शिवसेना) |
शाहूवाडी विधानसभा | सत्यजित पाटील (शिवसेना) | विनय कोरे(जनसुराज्य) | विनय कोरे (जनसुराज्य) | |
हातकणंगले विधानसभा | सुजित मिणचेकर (शिवसेना) | राजू जयवंत आवळे (काँग्रेस) | अशोकराव माने | राजू जयवंत आवळे (काँग्रेस) |
इचलकरंजी विधानसभा | सुरेश हळवणकर(भाजप) | राहुल खंजिरे (काँग्रेस) | प्रकाश आवाडे (अपक्ष) | प्रकाश आवाडे (अपक्ष) |
कोल्हापूर दक्षिण | अमल महाडिक (भाजप) | ऋतुराज पाटील (काँग्रेस) | ऋतुराज पाटील (काँग्रेस) | |
कोल्हापूर उत्तर | राजेश क्षीरसागर (शिवसेना) | चंद्रकांत जाधव (काँग्रेस) | चंद्रकांत जाधव (काँग्रेस) |
2014 चा निकाल – कोल्हापूर जिल्हा – 10 (Kolhapur MLA List )
271 – चंदगड – संध्यादेवी कुपेकर – (राष्ट्रवादी )
272 – राधानगरी – प्रकाश आबिटकर (शिवसेना)
273 – कागल – हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
274 – कोल्हापूर दक्षिण – अमल महाडीक (भाजप)
275 – करवीर – चंद्रदीप नरके (शिवसेना)
276 – कोल्हापूर उत्तर – राजेश क्षीरसागर (शिवसेना)
277 – शाहुवाडी – सत्यजीत पाटील सरुडकर (शिवसेना)
278 – हातकणंगले – सुजीत मिणचेकर (शिवसेना)
279 – इचलकरंजी – सुरेश हळवणकर (भाजप)
280 – शिरोळ – उल्हास पाटील (शिवसेना)
कोल्हापुरातील पक्षीय बलाबल (2014)
एकूण विधानसभा मतदारसंघ – 10