OsmanabadAssembly result उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, तुळजापूर,उमरगा आणि परंडा असे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये उस्मानाबाद आणि परंडा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर तुळजापूर काँग्रेस आणि उमरगा शिवसेनेकडे गेले. म्हणजे राष्ट्रवादीला 2 तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक असे आमदार निवडून आले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उस्मानाबादमधील दिग्गज नेते पद्मसिंह पाटील आणि त्यांचे सुपुत्र राणा जगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघात यंदा लढतीचं वेगळंच चित्र पाहायला मिळालं.
टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
उमरगा | ज्ञानराज चौगुले (शिवसेना) | दिलीप भालेराव (काँग्रेस) | ज्ञानराज चौगुले (शिवसेना) |
तुळजापूर | राणा जगजितसिंह पाटील (भाजप) | मधुकरराव चव्हाण (काँग्रेस) | राणा जगजितसिंह पाटील (भाजप) |
उस्मानाबाद | कैलास पाटील (शिवसेना) | संजय निंबाळकर (राष्ट्रवादी) | कैलास पाटील (शिवसेना) |
परांडा | तानाजी सावंत (शिवसेना) | राहुल मोटे (राष्ट्रवादी) | तानाजी सावंत (शिवसेना) |
2014 चा निकाल
उस्मानाबाद जिल्हा – 04 (Osmanabad MLA List)
240 – उमरगा – ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
241 – तुळजापूर – मधुकर चव्हाण (काँग्रेस)
242 – उस्मानाबाद – राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)
243 – परांडा – राहुल मोटे (राष्ट्रवादी)
उस्मानाबादमधील पक्षीय बलाबल 2014
एकूण विधानसभा मतदारसंघ 4