Ratnagiri district Assembly results | रत्नागिरी जिल्हा विधानसभा निकाल

| Updated on: Oct 24, 2019 | 6:43 AM

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघापैकी तीन विधानसभा मतदार संघावर 2014 मध्ये सेनेनी भगवा फडकवला

Ratnagiri district Assembly results | रत्नागिरी जिल्हा विधानसभा निकाल
Follow us on

Ratnagiri Assembly result रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघ आहेत. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेची नाळ नेहमी कोकणाशी जुळलेली. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri  assembly seats) पाच विधानसभा मतदार संघापैकी तीन विधानसभा मतदार संघावर 2014 मध्ये सेनेनी भगवा फडकवला. तर दोन जागांवर राष्ट्रवादीने सेनेला धक्का दिला. पण पाच वर्षानंतर आता सेनेनी इथं आपली पक्कड मजबूत केली आहे.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
दापोलीयोगेश कदम (शिवसेना) संजय कदम (राष्ट्रवादी)
योगेश कदम (शिवसेना)
गुहागरभास्कर जाधव (शिवसेना) सहदेव बेटकर (राष्ट्रवादी)
भास्कर जाधव (शिवसेना)
चिपळूणसदानंद चव्हाण (शिवसेना)शेखर निकम (राष्ट्रवादी)
शेखर निकम (राष्ट्रवादी)
रत्नागिरीउदय सामंत (शिवसेना) सुदेश मयेकर (राष्ट्रवादी)
उदय सामंत (शिवसेना)
राजापूरराजन साळवी (शिवसेना) अविनाश लाड (काँग्रेस)
राजन साळवी (शिवसेना)

2014 चा निकाल

दापोली – संजय कदम (राष्ट्रवादी)
गुहागर – भास्कर जाधव (राष्ट्रवादी)
चिपळूण – सदानंद चव्हाण (शिवसेना)
रत्नागिरी – उदय सामंत (शिवसेना)
राजापूर – राजन साळवी (शिवसेना)