मुंबई – शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांनी बंड केल्यापासून दीपक केसरकर (Deepak Kesarkar) वारंवार त्यांच्या गटाकडून त्यांची भूमिका माध्यमांसमोर मांडत आहेत. अत्यंत संयमाने ते बंड केलेल्या आमदारांची भूमिका जनतेसमोर मांडत आहेत. गुवाहाटीला (Guwahati) असताना त्यांनी सर्वप्रथम मीडियाशी संवाद साधून मनातली खदखद व्यक्त केली. तेव्हापासून ते कायम आपली भूमिका परखडपणे मांडत राहिले आहेत. काल दिवसभर विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणुकीच्या कालावधीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. काल झालेल्या निवडणुकीदरम्यान कोणी बाद झालेलं नाही. उलट शिवसेनेकडून लोकशाहीचा खून केल्याचं स्पष्ट दिसत आहे. पण लोकशाहीत बहुमताला अधिक महत्त्व आहे हे पुन्हा एकदा सिध्द झालं आहे. लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला. पण आम्ही मुक्तपणाने मतदान करू शकलो अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी केली.
सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा अशी बाळासाहेबाची इच्छा होती. बाळासाहेबांची इच्छा मोदी अमित अशा आणि भाजपच्या मंडळींनी पूर्ण करून दाखवली आहे. तसेच महाराष्ट्रात काम करणार सरकार कार्यान्वित झालं आहे. आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार सरकारने आज केला आहे. तुमच्यापैकी प्रत्येकजण मुख्यमंत्री आहात हा विश्वास त्यांनी जनतेला दिला आहे. आमदार झोपेतून उठून खाली आली होते. आमदारकी रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळली याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. या व्हीडिओच्या माध्यमातून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे, अस वागू नका असा संदेश मुख्यमंत्र्यांनी सकाळीच सर्वांना दिला आहे. आज देखील महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.
फडणवीस यांच्या काळातील काही योजना मागील काही वर्षांत बंद पडल्या होत्या. त्या आता पुन्हा सुरू होतील, उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते आहेत. त्यांच्या बद्दल आम्ही बोलणार नाही, आम्हाला त्याच्या बद्दल आदर आहे. त्याचा गैरसमज झाला असेल काळाच्या ओघात हे गैरसमज दूर होतील. जलयुक्त शिवार हे फडणवीस याचं स्वप्न होत. योजना अंमलात येताना काही चुका होतात याचा दोष प्रमुखावर कसा दिला जाऊ शकतो. न्यायालयाने किती वेळा चपराक द्यावी याला मर्यादा आहे. आज ची याचिका एक मिनिटात निकालात काढली आहे. यातून त्यांनी धडा घ्यावा, या माध्यमातून आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करू नका असा मेसेज त्यांनी गोव्यातून दिला होता.