आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस (Second day of Monsoon session Live) आहे. पहिला दिवस चांगलाच वादळी ठरला. विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. नव्या सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशनामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना पहायला मिळाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (maharashtra assembly session Live) नव्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र त्यानंतर दुपारी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल. दरम्यान आजचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवरून कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. आपण जाणून घेणार आहोत अधिवेशनाबाबतची (assembly session Live) प्रत्येक अपडेट. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी विरोधक चंगालेच आक्रमक झाले असून, विरोधकांकडून सरकारविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे.
रायगडच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही हायअलर्ट
पुणे पोलीस आयुक्त अभिताप गुप्ता यांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक
– नागपूर पोलिसांनी जारी केलाय अलर्ट
– रायगडमध्ये दोन बोट आढळल्याच्या पार्श्वभुमिवर अलर्ट
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती
चंद्रपूर- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूरच्या दोन अस्थायी कर्मचाऱ्यांना लाच घेताना एसीबीने केली अटक,
प्रशिक्षण संस्थेमध्ये मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा चार महिन्याचा थकीत पगार काढून दिल्यामुळे आणि उर्वरित तीन महिन्याच्या पगार काढून देण्यासाठी मागितली लाच,
लाच घेणारा एक कर्मचारी मानधन तत्वावर तर दुसरा कंत्राटी तत्त्वावर करत होता कार्यरत,
लाचेची बारा हजार रक्कम घेत असताना शांताराम राठोड गटनिदेशक आणि प्रशांत वांढरे निदेशक या दोघांना रंगेहात केली अटक
विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे या आज चांगल्याच आक्रमक झाल्याच्या पहायला मिळाल्या. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेमध्ये गुलाबराव पाटील बोलत असताना निलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना चांगलच सुनावलं आहे. छातीवर हात ठेवून कसंल बोलता तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी असं निलम गोऱ्हे यांनी पाटलांना म्हटलं आहे.
आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यांनी सभागृहात जोरदार टोलेबाजी केल्याचं पहायला मिळत आहे. देशात पहिल्यांदाज दाढीवाला मुख्यमंत्री झ्याल्याचे त्यांनी म्हटलं आहे. माझी दाढी पांढरी आहे, तर एकनाथ शिंदे यांची दाढी काळी आहे. मात्र सध्या देशात पांढऱ्या दाढीवाल्यांचाच प्रभाव असल्याचे भूजबळ यांनी म्हटले आहे.
आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही विधानसभा परिसरात गोंधळ पहायाला मिळाला. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीला शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही गद्दार नसून खुद्दार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Devendra Fadnavis Live आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जीएसटीवरून छगन भुजबळांचा सवाल
जीएसटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी लूट
जीएसटीवरून छगन भूजबळ आक्रमक
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पुराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान हा राज्यातील सध्याच्या घडीला असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी विधानसभेत थोरात यांनी केली.
Ajit Pawar Live : पालघरमध्ये आरोग्यचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यात असे अनेक दुर्गम भाग आहेत ज्यामध्ये अद्यापही आरोग्य सुविधा पोहोचू शकत नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
सध्या पालघर जिल्ह्यातील बालकांमधील हत्तीरोगाचा प्रश्न गाजत आहे. याच मुद्द्यावरून आज विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना घेरल्याचे पहायला मिळाले. अजित पवार यांनी तानाजी सावंत यांना पालघर जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय जागांबाबत प्रश्न विचारला मात्र सावंत यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे विरोधकांनी त्यांची कोंडी केली. यावर उत्तर देताना हा प्रश्न आपण सोमवारी ठेवू असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.
विरोधक आक्रमक झाले आहेत, राज्य सरकारच्याविरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. आता या घोषणाबाजीला शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यत्तर दिले आहे. महाराष्ट्राला पोकळ घोषणा कळतात. सध्या विरोधक ज्या घोषणा देत आहेत त्या पोकळ घोषणा आहेत. मला पूर्ण खात्री आहे, सध्या जे लोक तिथे घोषणा देत आहेत, त्यातील अनेक शिंदे यांच्या बाजून आहेत. भविष्यात ते सर्व समोर येईलच. विरोध करणं हे विरोधकांचं कामच असतं असं सामंत यांनी म्हटलं आहे.
विधानसभेत पुन्हा राणे विरुद्ध भास्कर जाधव सामना
जाधव प्रश्न विचारत असताना नितेश राणे खाली बसून बोलले
मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा – जाधव
भास्कर जाधव आक्रमक
विरोधकांवर दबाव आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न – जयंत पाटील
विरोधक दबावाला बळी पडणार नाहीत – जयंत पाटील
पूर्वी ज्यांच्यावर आरोप झाले ते आता सत्तेत जाऊन बसले – जयंत पाटील
पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस
मराठवाड्यातील अतिवृष्टीवरुन घोषणाबाजी
ईडी, सीबीआयवर हल्लाबोल, विरोधकांची घोषणाबाजी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन
सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
विधानसभेचं कामकाज सरू
अवैध दारू प्रकरणात पीआय मोरेंना निलंबित करणार – फडणवीस
मोरे अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय
अवैध दारू प्रकरणात आमदार नमिता मुंदडा यांनी केली होती तक्रार
मुंदडांच्या तक्रारीनंतर कारवाईन न केल्याने कारवाई
आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल
आजचा दिवसही वादळी ठरणार!
राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. मात्र आता एकनाथ खडसे हे विधान परिषदेचे आमदार झाले आहेत. त्यामुळे आज अधिवेशनात एकनाथ खडसे तीन वर्षानंतर काय बोलतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. खडसे आज आपल्या खास शैलीमध्ये सत्ताधाऱ्यांचा समाचार घेण्याची शक्यता आहे.
नाराजीच्या अफेवर बच्चू कडू यांच स्पष्टीकरण
आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकतो.