मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस (Maharashtra Assembly Monsoon Session 2022 Live) आहे. गेले पाच दिवस अधिवेशन चांगलेच वादळी ठरले. विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेत पाचही दिवस विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. पाचवा दिवस विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या राड्यामुळे चांगलाच गाजला (Assembly Monsoon Session Live). बुधवारी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सत्ताधारी गोटातील आमदार चार दिवस शांत होते. मात्र अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी त्यांनी देखील विरोधकांच्या घोषणांना प्रत्युत्तर दिल्याने गोंधळ उडाला प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. पावशाळी अधिवेशनात (Monsoon Session Live) शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा चांगलाच गाजला. आज शेवटचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे.
कुपोषणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ
विरोधकांकडून मंत्री विजयकुमार गावीत यांना घेरण्याचा प्रयत्न
विरोधकांनी केला सभात्याग
Assembly Monsoon Session Live : विरोधी पक्षनेते अजित पवार लाईव्ह
कुपोषणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ
विरोधकांनी मंत्री विजयकुमार गावितांना घेरलं
आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस
शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
विरोधकांकडून राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या आंदोलनाला सुरुवात
मविआ नेत्यांकडून आंदोलन
सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
Assembly Monsoon Session Live : आमदार भरत गोगावले लाईव्ह
ॉ
खड्ड्यांचे खोके, मोतोश्री ओके, सत्ताधाऱ्यांच्या घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनाच्या आवारात दाखल
आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस
शेवटचा दिवसही वादळी ठरणार
युवराजांची दिशा चुकली, सत्ताधाऱ्यांची पोस्टरबाजी
सत्ताधारी आमदारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
सत्ताधाऱ्यांची विधीमंडळ पायऱ्यांवर घोषणाबाजी
आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गट, भाजप आमदारांची पोस्टरबाजी
शिंदे गट आणि भाजपाचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
मविआ विरोधात जोरदार घोषणाबाजी
पुन्हा एकदा सत्ताधारी, विरोधक आमने-सामने
शिवसेना नेते सचिन अहिर लाईव्ह
टोणणे मारण हा उद्धव ठाकरेंचा स्थायी भाव – दरेकर
उद्धव ठाकरेंची वक्तव्य वैफल्यग्रस्त भावनेतून
प्रवीण दरेकरांचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर
आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांच ते कार्ट अशी उद्धव ठाकरेची पद्धत – दरेकर
आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. मागील पाच दिवस पहाता आजचा दिवस देखील वादळी ठरू शकतो. आज विधिमंडळात अनेक महत्त्वांच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या काकाजाला सुरुवात झाली आहे.
आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. काल पाचव्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. यावरून आता सामानाच्या संपादकीयमधून शिंदे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. शिंदे सरकारने काल गोंधळाचा ट्रेलर दाखवला, पुढे कोणता पिक्चर दाखवणार? अस सवाल सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आला आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आता 20 लाखांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. पूर्वी अशा प्रकारच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना 15 लाखांचे अर्थसहाय्य देण्यात येत होते. मात्र आता ही रक्कम वाढून 20 लाख रुपये करण्यात आली आहे.