आज पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Monsoon Session Live) चौथा दिवस आहे. चौथा दिवस देखील अपेक्षेप्रमाणे वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाचे तीन दिवस (Assembly Monsoon Session Live) विरोधकांच्या आंदोलनाने आणि घोषणाबाजीने चांगलेच गाजले. विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वेगवेगळ्या मागण्या केल्या. सध्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा गाजत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी आवाज उठवलाय. दुसरीकडे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेतून सरपंच निवडीबाबतचे विधेयक मांडले (Monsoon Session Live). मात्र या विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला. यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगल्याचे पहायला मिळाले. आज देखील विधिमंडळात अनेक प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौथा दिवस देखील वादळी ठरू शकतो.