मुंबई : राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशीही तिसऱ्या दिवशीही विरोधकांकडून घोषणाबाजी सुरुच आहे.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेला अतिरिक्त अर्थसंकल्प हा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आधीच फुटल्याचा आरोप विरोधकांचा आहे. त्याची चौकशीची मागणी विरोधकांनी केली आहे. एकीकडे याबाबत विरोध सुरु असताना, दुसरीकडे विरोधकांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांनाही चुचकारण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधकांनी सरकारला टोमणे लगावले.
[svt-event title=”खडसेंना पाहून घोषणाबाजी” date=”19/06/2019,11:36AM” class=”svt-cd-green” ]
नाथाभाऊंना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो, अजित पवारांची घोषणाबाजी https://t.co/0lpAk729ie @rahul_zori pic.twitter.com/x6h8w20SNP
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 19, 2019
[svt-event title=”खडसेंकडून सरकारची कानउघडणी” date=”19/06/2019,11:36AM” class=”svt-cd-green” ] भाजप नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला धारेवर धरले. सर्वात जास्त कुपोषण झाले आहे. 10 वर्ष आदिवासी विभागातील निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. वेतनश्रेणी लागू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही, अशी कानउघडणी खडसेंनी केली. यावर मंत्री अशोक उईके यांनी उत्तर दिले की लवकरात लवकर 30 तारखेपर्यंत वेतनश्रेणी लागू करण्यात येईल. [/svt-event]
[svt-event title=”जयंत पाटील यांची प्रतिक्रिया” date=”19/06/2019,11:41AM” class=”svt-cd-green” ] राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी फुटला होता याची चौकशी झाली पाहिजे. आजही आमची हीच मागणी आहे. सायबर क्राईमची मागणी आम्ही केली आहे. विधानसभा अध्यक्ष यांनी चौकशी करावी अशी आमची मागणी आहे – जयंत पाटील [/svt-event]
[svt-event title=”विधानपरिषद उपसभापती निवडणूक घेण्यास काँग्रेसची सहमती” date=”19/06/2019,11:39AM” class=”svt-cd-green” ] विधानपरिषद उपसभापती निवडणूक घेण्यास काँग्रेसची सहमती. उपसभापती पदावरुन रामराजे निंबाळकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न. शिवसेना- भाजप उपसभापतींवर अविश्वास प्रस्ताव आणणार [/svt-event]