मुंबई : आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होतेय. यासाठी ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक यांच्यात संघर्ष होण्याची शक्यताय. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीनं आपल्या उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार आहे. आज ही निवडणूक पार पडणार आहे.
मुंबई- शिवसेना नेते कुठल्या संविधानाबद्दल बोलतायेत, माहित नाही. पक्षाच्या घटनेला ते घटना मानत असतील तर तसे नाही. याबाबत आम्ही जो अर्ज विधिमंडळाला अर्ज केला होता. त्याला विधिमंडळ सचिवालयाने उत्तर दिले आहे. त्याला विधानसभा सचिवांनी उत्तर देत एकनाथ शिंदे हेच गटनेते आहेत आणि भरत गोगावले हे प्रतोद आहेत, यावर शिक्कामोर्तब केले आहे. कोर्टही एका विशिष्ठ मर्यादापलिकडे विधिमंडळ कामकाजात हस्तक्षेप करु शकत नाही, असे शिंदे समर्थक आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिलीय. त्यांना काय वाटतं त्यापेक्षा कायदा श्रेष्ठ आहे, असेही ते म्हणाले आहेत. लोकशाहीत आकड्यांना महत्त्व असतं, ते आकडे ज्यांच्याकडे असतात, तेच योग्य असते. असेही ते म्हणाले.
मुंबई – विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी आपल्या नावाला मंजुरी दिली होती. याबाबत शिवसेनेची अधिकृत बैठक झाली होती. गटनेते ठरवण्याचा अधिकार हा विधीमंडळाला कसा, असा प्रश्न अजय चौधरी यांनी उपस्थित केला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, त्यामुळे याचा निर्णय तिथेच होईल, असे चौधरी यांनी सांगितले आहे. अखेरच्या क्षणापर्यंत याविरोधात न्यायायलीन लढा देऊ, असे चौधरी यांनी सांगितले आहे.
मुंबई – हा तर संविधानाची खिल्ली उडवण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. गटनेता नेमण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखाला असतो. ही कारवाी बेकायदेशीर असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. या विरोधात कोर्टात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. संविधानाला पायदळी तुडवून हा निर्णय घेण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया अरविंद सावंत यटांनी दिली आहे. देशाची वाटचाल ही हुकुमशाही कडे जात असल्याचे हे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे.
मुंबई- एकनाथ शिंदे हेच विधीमंडळ गटनेते आहेत, यावर विधिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे अजय चौधरी यांचे गटनेतेपद रद्द करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानण्यात येतो आहे. काही वेळापूर्वीच हा निर्णय पारित करण्यात आला आहे. विधिमंडळ सचिवालयानं याला मान्यता दिली आहे. शिंदे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिली असल्यामुळे आता भर गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचे मान्य करण्यात आले आहे.
मुंबई- एकनाथ शिंदे सरकारचे विश्वासमत उद्या सिद्ध झाल्यानंतर संध्याकाळी खातेवाटपाबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे. उद्या संध्याकाळी सात वाजता भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि पियुष गोयल यांच्यातही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना उद्याचा प्लॅन समजावला आहे. तसेच बहुमत चाचणी आपणच जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. शिंदे समर्थक आणि भाजपा आमदारांच्या बैठकीत हा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे. उद्यापासून सर्व आमदारांना मतदारसंघात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच या आमदारांना वाय सुरक्षा असेल. त्यामुळे मतदारसंघातही त्यांना समस्या उद्भवणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सध्या मुंबईत सुरु आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेते पद अजित पवार यांनी घ्यावे, यासाठी सगळ्यांचा आग्रह असल्याचे मानले जात आहेत. मात्र अजित पवार यासाठी तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होते आहे. थोड्याच वेळात पत्रकार परिषद होईल, त्यात घोषणा होण्याची शक्यता आहे.
मुंबई- शिवसेनेचे चार खासदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटल्याची माहिती टीव्ही9 ला सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेसोबत युती करा, अशी मागणी या चार खासदारांनी केली आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार हे फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते आहे. आता एकनाथ शिंदे गट राज्यात भाजपासोबत गेल्यानंतर आता केंद्रातही शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हायला हवे, अशी खासदारांची भूमिका आहे. उद्धव ठाकरेंनी आता याबाबत निर्णय घ्यायला हवा, अशी शिवसेनेच्या काही खासदारांची भूमिका आहे.
मुंबई– विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर आता उद्या बहुमत चाचणी सभागृहात होणार आहे. त्यासाठी ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये शिंदे समर्थक आमदार आणि भाजपा आमदारांची एकत्र बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत.
मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारतर्फे राज्यपालनियुक्त 12 आमदारांची नवी नावे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या यादीत पंकजा मुंडे यांनाही स्थान मिळेल, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे भाजपाचे नेते सुरेश धस यांनी म्हटले आहे. पक्षात निर्णय होत असतात, असेही त्यांनी म्हटले आहे.
पणजी– शिंदे गटाच्या आमदारांचं वास्तव्य असलेल्या गोव्यातील ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये ओळख लपवून राहणाऱ्या दोघांना पणजी पोलिसांनी अटक केली होती. सोनिया दोहन आणि श्रेयस कोतियाल अशी या दोघांची नाव आहेत. विशेष म्हणजे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून पणजी पोलिसांनी दोघांवर कारवाई केली होती. दरम्यान आज न्यायालयाने प्रत्येकी 20 हजारांच्या जातमुचलक्यावर सोनिया दोहन आणि श्रेय कोथियाल या दोघांचीही जामिनावर मुक्तता केलीय.
मुंबई- शिवसेनेच्या 39 आमदारांनी व्हीपविरोधात मतदान केले. त्यासाठी नव्या विधानसभा अध्यक्षांकडे याचिका केली आहे. या आमदारांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मान्यता असलेल्या पक्षाचे आदेशच चालतात, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षालाच मान्यता आहे, असे अरविंद सावंत यांनी सांगितले आहे. शिंदे गटाचे अस्तित्व काय, त्यांना मान्यता आहे का, असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. पक्षाचे प्रमुख हे गटनेत्यांची निवड करतात. कायद्यानुसार शिंदेंना गटनेते म्हणून मान्यता नाही.
मुंबई- नवी मुंबईतील शिवसैनिकानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. शिवसेनेमध्ये बंडाळी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरताना दिसतायेत. आज त्याचाच प्रत्यय मातोश्रीवरही पाहायला मिळाला. नवी मुंबईतील शिवसैनिक मातोश्रीवर आले आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा दर्शवला आहे.
मुंबई– विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर आता उद्या बहुमत चाचणी सभागृहात उद्या होणार आहे. त्यासाठी थोड्याच वेळा ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये शिंदे समर्थक आमदार आणि भाजपा आमदारांची एकत्र बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करणार असल्याची माहिती आहे.
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. नवं सरकार मुंबई ते अहमाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला गती देणार असल्याची माहिती आहे. या साठीचा खर्च एकनाथ शिंदे सरकार करणार असल्याचीही माहिती आहे.
मुंबई- मतदारसंघातील लोकांना पहिल्यांदाच १५ ते २० दिवसांनी भेटतो आहे. ते माझ्या पाठिशी उभे आहेत, हा धीर आहे. मतदारसंघातील कामे आणि विकास याच्याकरता ध्यास घेतला आहे. तो पूर्ण करण्यासाठी त्यांचा पाठिंबा आहे. आज १६४ मते मिळाली. दोन जण अनुपस्थित होते. उद्या फक्त औपचारिक प्रक्रिया आहे. व्हीपबाबत कोर्टात निर्णय होईल. असे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.
मुंबई – उद्याच्या बहुमत चाचणीबाबत राष्ट्रवादीची बैठक मुंबईत वाय बी सेंटरमध्ये होते आहे. विरोधी पक्षनेत्याचा निर्णयही यात होणार आहे. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. शरद पवार हेही बैठकीला उपस्थित असणार आहेत. अमरावतीच्या प्रकरणात जे सत्य आहे ते समोर आले आहे, ते दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला नव्हता, आता एनआयएचा तपास सुरु आहे, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संजय पांडे यांना ईडीचे समन्स पाठवण्यात आले आहे. 5 जुलैला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जुन्या एका मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना हे आदेश देण्यात आले आहेत. त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदाची कारकीर्द ही वादग्रस्त ठरली होती.
मुंबई – विधीमंडळातील नेता हा बहुमतानेच निवडता येतो. तो अल्पमताने निवडता येत नाही. अशा प्रकारची कारवाई कायद्याने ग्राह्य धरता येणार नाही. त्या कारवाईच्या आधारावर व्हीप दिला असेल तर लागू होत नाही. बहुमत असलेल्यांनी कायद्याप्रमाणे ठराव केलाय तोच लागू होईल. मात्र याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष करतील. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यावर जास्त बोलता येणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई- मागच्या सरकारचे कुठलेही निर्णय हे सरसकट रद्द करणार नाही, किंवा त्यांची तपासणी करणार नाही. मात्र जे निर्णय चुकीचे आहेत, शंकेला वाव आहे, कुहेतूने घेतलेले असे निर्णय रद्द करु, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई- आरेमधील होणारा विरोध हा काही प्रमाणात स्पॉन्सर्ड आहे, पर्यावरणवाद्यांचा सन्मान करतो, त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. पण ग्रीन ट्रिब्युनलने परवानगी दिल्यानंतर जो प्रकल्प सुरु झाला. झाडे कापलेली आहेत. २५ टक्के प्रकल्प पूर्ण झाला. आता झआडे कापण्याची गरज नाही. आता जर काम सुरु केले तर वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकेल.
मुंबई- आमच्याकडे बहुमत आहे, विश्वासमताचा ठराव उद्या भक्कम मतांनी जिंकणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राहुल नार्वेकर यांची देशात सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. आमच्याकडे बहुमत आहे, हे सिद्ध झाले आहे. अमरावतीची घटना ही क्रूर आहे. याचा मास्टर माईंड आणि आरोपी पकडण्यात आले आहेत. याचे काही बाहेरचे कनेक्शन आहे का, हेही समोर येईल. यातील आणखी काही मुद्दे, समोर आणले जातील.
मुंबई – विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदनीय प्रस्तावावर शिवसेनेचे प्रतोद म्हणून विधानसभा अध्यक्षांनी बोलण्याची संधी सुनील प्रभू यांनाच दिली, ती भरत गोगावले यांना मिळाली नाही, याचाच अर्थ शिवसेनेचे मुख्य प्रतोद हे सुनील प्रभू हेच आहेत, हे अधोरेखित होते, असा युक्तिवाद भास्कर जाधव यांनी केला आहे. विद्यमान उपाध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष अशा दोघांनी शिवसेनेचे पक्षप्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची निवड केली आहे, असेही ते म्हणाले. भरत गोगावले यांनी दिलेले पत्र आफ्टर थॉट असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हे पत्र लिहून आणा हे सभागृहात कुणी खुणावलं हे आपण स्वतः पाहिलं आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी राज्यपालांवरही टीका केली. काही दिवसांपूर्वी अस्तित्वात आलेल्या सरकारला ताबडतोब अध्यक्षपदाची निवड करण्याची संधी राज्यपालांनी दिली. राज्यपाल महोदयांनी घटनेची बुज चांगल्या प्रकारे दाखवली, लोकशाहीचा मान राज्यपालांनी राखला नवीन आजची निवडणूक पार पडली, असा उपहासात्मक टोला भास्कर जाधव यांनी राज्यपालांना लगावलाय
मुंबई- राज्यात पावसानं दांडी मारल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. दुबार पेरणीचं संकट आहे. उद्या सभागृहात हा प्रश्न उपस्थित करणारआणि शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी सर्वे सुरु करा, अशी मागणी करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मुंबई- शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या 16 आमदारांवर कधीही कारवाई होऊ शकते, असे भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे यांच्या 39 जणांचा गट शिवसेनेचा असल्याच घोषित केले आहे. तर इतर 16 जण हे अघोषित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही कारवाई होऊ शकते असे प्रसाद लाड म्हणाले आहेत.
मुंबई- विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर आता उद्या बहुमत चाचणी सभागृहात उद्या होणार आहे. त्यापूर्वी आज संध्याकाळी ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये शिंदे समर्थक आमदार आणि भाजपा आमदारांची एकत्र बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करणार असल्याची माहिती आहे.
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याची निवड आज संध्याकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीत होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. बंडखोर आमदारांवर कारवाई होईल, ती येत्या काही काळात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबई- सगळे पेच सुटतील, असे सूचक वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. सभागृह संवैधानिक तरतुदींप्रमाणे आणि नियमांप्रमाणे चालते असेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबई – अजय चौधरी यांनी शिवसेनेचा व्हीप पाळला नाही, हे पत्र विदानसभा उपाध्यक्षांना दिलं, आणि एका ज्येष्ठ नेत्यानं हे लक्षात आणून दिलं हे महत्वाचं आहे, असे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सांगितले. शिवसेनेच्या आमदारांनी व्हीप न पाळल्याने राजन साळवी यांचा पराभव झाल्याचे प्रभू यांनी सांगितले. ज्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर त्यांना शिंदे गटातून देण्यात आलेलं पत्र तांत्रिकदृष्ट्या चूक असल्याचे सुनील प्रभू यांनी सांगितले.
नांदेड – आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे काही खासदार फुटणार असल्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे, मात्र हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी ह्या चर्चात तथ्य नसल्याचा दावा केलाय. रात्रीच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या खासदारांची बैठक घेतली त्या बैठकीला 16 खासदार उपस्थित होते अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिलीय. नांदेडमध्ये बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघात आयोजित सेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हेमंत पाटील बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच असलेल्या खासदार हेमंत पाटील यांनी या मेळाव्याला हजेरी लावत बंडखोरांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी खासदार फुटीच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
मुंबई- शिवसेनेच्या व्हीपबाबत जो मुद्दा उपस्थइत झाला आहे, त्याच्यावर ११ जुलैला सुनावणी होणार आहे. त्यावेळी राज्यपालांच्या भूमिकेवरही चर्चा होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. जो निर्णय विधानसभा उपाध्यक्षांच्या कक्षेतील होता, तो कोर्टात गेला असल्याचेही त्यांनी सांगितले. ११ जुलैला याचा कोर्टात निर्णय होईल, असेही नाना पटोले यांनी सांगितले. विरोधी गटात जो मोठा असेल त्याचा विरोधी पक्षनेता होईल, असे सांगत राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेतेपद जाईल, असे पटोले यांनी सांगितले.
मुंबई- शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी एकाही आमदाराने डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत केली नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. हे आमदार जेव्हा त्यांच्या मतदारसंघात जातील, तेव्हा काय करतील असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. बंडखोर आमदारांवर जो कोट्यवधींचा खर्च केला, तो कुठून आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमचा व्हीप पहिल्यांदा उपाध्यक्षांकडे दिला होता, त्यांनी तो मान्य केला आहे. आता याचा निर्णय कोर्टातच होईल. नैतिकतेच्या चाचणीत शिंदे बंडखोर नापास झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.
मुंबई- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना 164 मने मिळाली तर राजन साळवी यांना 107 मते मिळाली आहेत.
कोणत्या 13 सदस्यांनी मतदान केले नाही, तर सपाचे दोन आमदार आणि एमआयएमचे एक आमदार तटस्थ राहिले.
1. नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस (तुरुंगात)
2. अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (तुरुंगात)
3. निलेश लंके, आमदार, राष्ट्रवादी
4. दिलीप मोहिते, आमदार, राष्ट्रवादी
5. दत्ता भरणे, आमदार, राष्ट्रवादी
6. बबन शिंदे, आमदार, राष्ट्रवादी
7. अण्णा बनसोडे, आमदार, राष्ट्रवादी
8. लक्ष्मण जगताप, आमदार भाजपा (आजारी)
9. मुक्ता टिळक, आमदार, भाजपा (आजारी)
10. प्रणिती शिंदे, आमदार, काँग्रेस
11. मुफ्ती इस्माईल , आमदार, एमआयएम
12. रमेश लटके (दिवंगत)
13. नरहरी झिरवळ ( उपाध्यक्ष मतदान करु शकत नाहीत)
मुंबई- विधानसभा अध्यक्ष झालेल्या राहुल नार्वेकर हे विधानसभेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. या सासरे आणि जावई यांच्या नात्याबद्दल अनेकांच्या बोलण्यातून उल्लेख झाला. जावई आमच्याकडे लक्ष देतील असे वक्तव्य शुभेच्छा देताा अजित पवार आणि जयंत पाटील यांनी केले. शेवटी अभिनंदन प्रस्तावावर बोलताना आपणच जावयाची काळजी घ्या, असे आवाहन नवे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नेत्यांना केले आहे.
Maharashtra assembly speaker election : शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून एक पत्र आलं असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं.
शिवसेना विधीमंडळ प्रतोद यांच्या पत्राप्रमाणे शिवसेना विधीमंडळांच्या 16 सदस्यांची विरोधी मतदान केलं आहे, त्याची नोंद घेण्याची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे नोंद घेतल्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली.
भरत गोगावले यांची नेमणूक मुख्य प्रतोद म्हणून एकनाथ शिंदे यांनी केली होती. भरत गोगावले हे एकनाथ शिंदेच्या बंडखोर गटातील एक असून शिंदेंची गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर शिंदेंनी भरत गोगावलेंची मुख्य प्रतोद म्हणून नेमणूक केलेली होती.
Maharashtra assembly speaker election : आमचे आजचे अध्यक्ष पुढे जाऊन लोकसभेचेही अध्यक्ष होऊ शकतात, दीपक केसरकर यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करताना जागवल्या सावंतवाडीच्या आठवणी, सावंतवाडी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याच्याही दिल्या शुभेच्छा
व्हीपबद्दल चर्चा करण्याचा आजचा दिवस नाही, दीपक केसरकरांचा अप्रत्यक्षपणे सुनील प्रभू यांना टोला
आम्ही व्हीपवर आज बोलणार नाही, विधीमंडळ पक्ष म्हणून आम्हीही व्हीप काढलेला आहे, पण त्यावर आम्ही बोलणार नाही- दीपक केसरकर
Maharashtra assembly speaker election : फडणवीसांना अडीच वर्षांआधीच सांगितलेलं, आदित्य ठाकरेंचा टोला, तेव्हा ऐकलं असतं तर आता परिस्थिती कदाचित पलटलेलीही असतील, अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना आदित्य ठाकरेंचं वक्तव्य
सगळ्या अर्थांनी राहुल नार्वेकर यांचं वजन वाढलंय, आदित्य ठाकरेंचा टोला, आता कुलाब्याच्या घरी चालत जाऊ नका, नाहीतर मनावर घ्याल, आदित्य ठाकरेंचा टोला
आता बच्चन साहेबांच्या भाषेत सांगायचं तर परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन यांचं पालन तुम्ही कराल, अशी आशा बाळगतो, असं आदित्य ठाकरेंनी राहुल नार्वेकरांबाबत बोलताना म्हटलंय.
राजकारणाची पातळी खूप खाली चाललीये, हे तरुणांना न पटणारं आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
Maharashtra assembly speaker election : सर्व छोट्या पक्षांना, आमदारांना आणि सदस्यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त करताना नाना पटोलेंनी केलं विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन
यशोमती ठाकूर यांचा भाजपवर टोला, आऊटसोर्स मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते असा कारभार असल्याची टीका
यशोमती ठाकूर यांचा टोला :
आउटसोर्स मुख्यमंत्री, आउटसोर्स विधानसभा अध्यक्ष, आउटसोर्स विधानपरिषद विरोधीपक्षनेते असा सगळा कारभार आहे. भाजप मधल्या निष्ठावंतांना शुभेच्छा!!!
नवनिर्वाचित अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांचे मनापासून अभिनंदन. #Maharashtra #AssemblySpeaker— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) July 3, 2022
Maharashtra assembly speaker election : जयंत पाटील यांच्याकडून राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, जागा सोडणे, समोरची भाषणं करताना मध्येमध्ये बोलणे, भाषणं करत असताना मध्येमध्ये बोलणे, याबाबतची शिस्त वाढवली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय.
वयाच्या 27 व्या वर्षी सभागृहात आलो, तेव्हा भाषण सुरु असताना अध्यक्ष उभे राहिलो की तिथेच उभे राहिलो, समज द्यावी, हा शब्द कदाचित कुणाला आवडणार नाही, हिरव्या कारपेटवर पाय ठेवून आपण आत येतो, तेव्हा शिस्तीचं पालन केलंच पाहिजे, असं ते म्हणालेत.
भाषण करताना पूर्ण भाषण करुन देण्यासाठी पूर्ण भाषण करुन देण्यासाठी काय करायचं, यासाठी काहीतरी शिस्त पाळली गेली पाहिजे.
जावई हे कुंडलीतलं दशम स्थान कसं चुकीचं आहे, हे कसं दाखवण्याची संधी देवेंद्रजी आपल्यासमोर आले. नार्वेकरसाहेब आम्हाला न्याय देतील, असा विश्वास आम्ही व्यक्त करतो, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.
Maharashtra assembly speaker election : राहुल नार्वेकरांना आदित्य ठाकरे गुरुदक्षिणा म्हणून उरलेले सदस्यही देऊ शकतात
सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन ठरावावेळी बोलताना टोला
काँग्रेसलाही सुधीर मुनगंटीवार यांचा निशाणा
अध्यक्षपदासाठी माझं नाव सुचवलं, याबाबत माझं नाव सुचवलं, याबद्दल आभार, सुधीर मुनगंटीवार यांचा अजित पवारांना टोला
अजित पवारांवर सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार
अजित पवार जयंत रावांच्या कानात काहीच सांगू नका, त्यांच्या कानात सांगणं धोकाय, सुधीर मुनगंटीवार यांचा निशाणा
काही वाटलं तर आमच्या कानात सांगा, अजित पवारांना सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य
विकासासाठी झेंडा सोडून अजेंडा हाती घ्यावा लागेल- बच्चू कडू
अपक्ष, छोट्या पक्षांना त्यांचा मुद्दा बोलण्याची संधी मिळाली पाहिजे- बच्चू कडू
353 अजामीनपात्र केला असून तो जामीनपात्र करावा अशी मागणीही बच्चू कडू यांनी यावेळी केली.
अबू आझमी यांनी नमूद केलेल्या भाषणावर भास्कर जाधव यांचा आक्षेप
मुस्लिम आणि हिंदू असा भेद नाही, असं भास्कर जाधव यांचं उत्तर
अबू आझमींवर भास्कर जाधव यांची टीका
अबू आझमींना मुस्लिम नाव काढल्याचा उल्लेख केल्यावरुन गदारोळ
औरंगबादचं नाव संभाजीनगर केल्याच्या निर्णयामुळे अबू आझमींची महाविकास आघाडीवर टीका
विधानसभा अध्यक्षपद राज्यपालांनी अडवून धरलं होतं
हे पद बहुमतापेक्षाही घटनेनं चालणं जास्त चालणं गरजेचंय
अबू आझमी यांची विधानसभेत महत्त्वाची भूमिका
मोठे पक्ष आपली कामं बरोबर करवून घेतात, पण छोट्या पक्षांची अवस्था वाईट आहे- अबू आझमी
आम्हाला बोलण्याची संधीही मिळत नाही, आम्ही बोलायला उभे राहिलो की दोन मिनिटांत घंटी वाजवली जाते- अबू आझमी
आम्ही महाविकास आघाडीला समर्थन दिलं, याचं वाईट वाटतंय- अबू आझमी
औरंगाबादचं नाव बदलून तुम्हाला काय संदेश द्यायचाय- अबू आझमी
पुराने कोई शहर का नाम बदल देने से क्या होगा, नया कोई शहर बसाईए तो कोई बात हो, अबू आझमींचा टोला
अबू आझमींचं भाषण सुरु असताना अभिनंदन ठरावावर बोलण्याचं विधानसभा अध्यक्षांचं आवाहन
Maharashtra assembly speaker election : तरुण अध्यक्ष म्हणून गौरव आहे, असं सुनील प्रभू यांनी म्हटलंय. सुनील प्रभू यांनी म्हटलंय की, आधी तुम्ही शिवसेनेत होतात, त्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीत गेलात. नंतर भाजपात गेलात. कायदा समजून सांगण्याच्या प्रयत्नात तुम्ही होतात, तुम्ही कायदामंत्री व्हाल, असं वाटलं होतं. पण दुर्दैव आहे. नशिबाचे फेरे कधीही फिरू शकतात. नियती कुणावर कधीही आघात करु शकतो. ज्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहत होतो, त्यांनी उपमुख्यमंत्री पाहतोय. कायदामंत्री म्हणून पाहत होतो, त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून पाहतोय. आम्हाला देवेंद्रजींबद्दल दुःख वाटतंय, असं सुनील प्रभू म्हणाले.
आमचा व्हीप झुगारून 39 सदस्यांनी आमचा व्हीप झुगारला आहे, हेही मला यानिमित्तानं नमूद करावंसं वाटतं. या लोकशाहीचा सन्मान आणि अभिमान म्हणून सर्वोच्च पदावर बसलात, यासाठी सगळ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही याचा वापर कराल, असा विश्वास व्यक्त करतो. त्यामुळे किती दिवस तुम्ही या खूर्चीवर बसाल, हे दुर्दैवानंं मला नमूक करावंसं वाटतं, असंही त्यांनी म्हटलंय.
Maharashtra assembly speaker election : शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता भाजप असा प्रवास केलेल्या नार्वेकरांचे सगळ्यांशी जवळचे संबंध आहेत. तुम्ही काँग्रेसच का बाजूला ठेवली, हे काही कळलं नाही, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन करताना म्हटलं. तुम्ही सगळ्यांना सांभाळून घ्याल, अशी खात्री मला वाटते, असंही ते म्हणालेत.
Chagan Bhujbal : मला एक मेसेज आल्याचं म्हणत छगन भुजबळ यांनी जोरदार टोला हाणला.
विश्वनाथजी आनंद सगळ्यांना बुद्धिबळात हरवलं, तर त्यांना विचारलं की तुम्ही खेळाल का.. तर आनंद म्हणाले की मी आता खेळणार नाही, अमित शाह असा डाव टाकतात की कोणत्या सोंगट्या कुठे जातात, हे कळत नाही, असं म्हणत छगन भुजबळ यांनी टोला लगावलाय.
Maharashtra assembly speaker election : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून मी राष्ट्रवादीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो, असं अजित पवार यांनी म्हटलंय. आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी न्याय देण्याचं काम केलेलंय. राहुल नार्वेकरांकडून सगळ्यांना न्याय मिळेल आणि विकासाचं चाकं अधिक गतीमान होतील, असा विश्वास मी व्यक्त करतो, असं अजित पवार म्हणाले. दिग्गजांनी विधानसभेच्या अध्यक्षपदी काम केलंय. मधल्या काळात नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नरहरी झिरवळ यांना प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनीही या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असंही अजित पवारांनी यावेळी नमूद केलंय.
राजकीय जीवनात चढ उतार असतात, हे सगळ्यांनी पाहिलंय. कामकाज निःपक्षपणे चाललं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलंय. नार्वेकरांच्या रुपानं एक तरुण, अभ्यासू व्यक्तिमत्त्व सभागृहाला अध्यक्ष म्हणून मिळालंय. असं ते म्हणाले. राहुल नार्वेकर हे आधी शिवसेनेत होते. त्यावेळेस मला कानावर आलं होतं, आदित्य ठाकरेंचे जवळचे सहकारी म्हणून कायद्याचं बरचसं ज्ञान तुम्ही आदित्य ठाकरेंना देण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांवर आम्हीही लक्ष ठेवून असतो. नंतर जेव्हा मावळमध्ये मला उमेदवार पाहिजे होता, तेव्हा मी तुम्हाला विनंती केली आणि तुम्हाला उमेदवारी दिली. नंतर मोदींची जबदरस्त लाट असताना नार्वेकर तिथे पराभूत झाले. पण तेव्हा ते हुश्शार होते, त्यांनी सांगितली की हरलो तर कुठेतरी सदस्य राहिलो पाहिजे, असं ते म्हणाले होते. नंतर प्रवक्ते म्हणूनही त्यांनी चांगलं काम केलं.
राहुल नार्वेकर पक्षाच्या नेतृत्त्वाच्या इतके जवळ झाले, शिवसेनेत असताना आदित्यच्या जवळ, आमच्यात आल्यावर मला आपलंसं केलं, भाजपात गेल्यावर देवेंद्रजींच्या जवळ आले, आता एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पाहून घ्या.. असा टोला अजित पवारांनी लावलाय.
मोदी येण्याआधी भाजप या राज्याच येण्याची काहीच शक्यता नव्हती. आता आमच्याकडूनच तिथं गेलेली जास्त लोकं भाजपात गेलेली दिसतात. समोर आमच्याकडचीच दिसतात. हे पाहून मला भाजपातील मूळ मान्यवरांचं वाईट वाटतं. पहिली लाईनच जरी तुम्ही पाहिली, तरी तुमच्या लक्षात येईल. दीपक केसरकर काय चांगले प्रवक्ते झालेत, त्यावेळी आम्ही शिकवलेलं कुठे वाया गेलेलं नाही, असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला होता.
फडणवीसांनी शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा करतात भाजपची लोकं इतकी रडायला लागली, की गिरीश तर फेटा सोडून डोळ्यालाच लावतो की काय असं झालं होतं. सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. कुणी काहीही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनात धाकधूक आहेच. प्रत्येकानं सदसदविवेक बुद्धीला विचारून सांगा, की मनाला शांती झालीये का… असा प्रश्न त्यांनी विचारला.
चंद्रकात पाटील यांना बाका वाजवू नये, त्यांना मंत्रिपद मिळेल की नाही, याची काही शाश्वती नाहीये, असाही टोला अजित पवारांनी लगावला.
एकनाथ शिंदे तुम्ही एकदा माझ्या कानात जरी सांगितलं असतं, तर आम्हीच तुम्हाला तिथे बसायला सांगितलं असतं. होय की नाही आदित्य? .. असा प्रश्न विचारत अजित पवार यांनी सगळ्या सभागृहात एकच हशा पिकवला होता.
Maharashtra assembly speaker election : राहुल नार्वेकर देशातील तरुण विधानसभा अध्यक्ष आहेत, मी त्यांचं अभिनंदन करतो. विधानसभा अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तीसारखी आहे. हे कठीण काम आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. कायदेमंडळाला कायद्यात निष्णात असलेले अध्यक्ष मिळाले आहेत. याआधीच्या अध्यक्षांनीही उत्तम काम केलेलं आहे. त्याचंही मी स्मरण आणि अभिनंदन करतो. वरच्या सभागृहाचे सभापती आणि खालचे अध्यक्ष, हे नातं सासरे आणि जावयाचं आहे, हा एक योगायोग आहे. पण पुलं म्हणतात, जावई आणि सासऱ्याचं एकमत होणं कठीण आहे. जावयाचा उल्लेख असा करतात, की जावई म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतला दशम ग्रह आहे. पण असं नाहीये, त्यांचं प्रेम आहे सासऱ्यावर, असंही फडणवीस यांनी अभिनंदनाचा ठराव करताना केला.
नार्वेकर कुटुंब हे सावंतवाडीचं आहे. गोव्यातही त्यांचं वास्तव्य राहिलंय. अनेक वर्षांपासून ते मुंबईत राहिलेत. आपल्या वडिलांच्या समाजकारणाचा वारसा तुम्हाला मिळाला आहे, असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. 15 वर्ष आपण वकिली केली. अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून आपण काम केलं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं योगदान आपण आता देणार आहात, यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्राच्या जनतेला होईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय. दोन्ही बाजूंना न्याय देत उत्तम प्रकारचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम कराल, अशा शुभेच्छा देतो.
Maharashtra assembly speaker election : सत्तेतून पायउतार होऊन पहिल्यांदाच लोकं बाहेर गेली, माझ्यासोबत आठ ते नऊ मंत्री सत्तेतून पायउतार झाले, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, एकनाथ शिंदे हा बाळासाहेब आणि एकनाथ शिंदे यांचा एक सर्वसामान्य सैनिक होता. ज्यांनी ज्यांनी मला सांगितलं की आमच्या संपर्कात 10-20 आहेत. त्यांना सांगितलं की तुम्ही नावं सांगा, मी त्यांनी चार्टर्ड विमानाने परत पाठवतो. कुणावरही जबरदस्तीचा प्रयत्न झालेला नाही. 115 लोक त्यांच्याकडे होते. माझ्याकडे 50 लोक असताना, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मुख्यमंत्रीपदासाठी मला समर्थन दाखवलं, यासाठी मोदी, शाह, जेपी नड्डा यांचे मी आभार मानतो. सगळ्यांना वाटलं की फडणवीस मुख्यमंत्री बनतील. मला खरंच काही नको होतं. पण माझ्या वैचारीक भूमिकेला पाठिंबा दिला. या निर्णयामुळे या राज्यातल्या सर्व पक्षांच्या डोळ्यात अंजन घालणारा निर्णय भाजपने घेतलेला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटंलय.
Maharashtra assembly speaker election : विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला झुकतं मात द्यावं, अशी आमची अपेक्षा नाही, एकनाथ शिंदे यांचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून विधान, विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन ठरावावेळी राहुल नार्वेकरांना उद्देशून एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य, पारदर्शक सरकार चालवण्यासाठी मदत करण्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन
महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले. pic.twitter.com/JBRKWrKJv6
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 3, 2022
Maharashtra assembly speaker election : सभागृहाचा नेता नात्यानं एकनाथ शिंदेंकडून विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव
विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर मोठी मानाची पदं मिळवण्याची संधी अनेकांना मिळाली- शिंदे
ज्यांनी ज्यांनी हे पद भूषवलं त्यांचा देशपातळीवर गौरवलं गेलं- शिंदे
हा ऐतिहासिक क्षण सगळे पाहतायत, अनुभवतायत- शिंदे | पाहा LIVE Video
Maharashtra assembly speaker election : राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी
राजन साळवी यांचा पराभव
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून अध्यक्षपदी निवड
निवड होताच भाजप आमदारांकडून जय श्री रामची घोषणा
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून जय भवनी, जय शिवाजीची घोषणा, भारत माता की जय आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
Maharashtra assembly speaker election : शिवसेनेच्या व्हीप विरोधात मतदान केलेल्या आमदारांची रेकॉर्डवर नोंद घेण्यात आल्याची उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची माहिती
संबंधित व्हिडीओ रेकॉर्डिंगचा पुरावाही असल्याचं जाहीर
बाळासाहेब थोरात यांच्या मागणीनंतर विधानसभा उपाध्यक्षांची सभागृहात माहिती
Maharashtra assembly speaker election : अबू आझमी, रईस शेख यांची तटस्थ भूमिका
तिघा आमदारांची तटस्थ भूमिका
Maharashtra assembly speaker election : अमरावती शिवसेनेत दोन गट झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरची शिवसैनिकांनी तोडफोड करण्यात आली आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनंत गुढे यांच्या मुलाने अमरावतीच्या राजकमल चौकात हे बॅनर लावले होते. या बॅनरवर संताप व्यक्त करण्यात आलाय.
बहुजन विकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांचं भाजपच्या बाजूने मतदान
सपाचे अबू आझामी तटस्थ
महाविकास आघाडीकडून उभे असलेल्या शिवसेनेच्या राजन साळवींवर पराभवाचे ढग
Rahul Narvekar: राहुल नार्वेकरांचा विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत विजय निश्चित
राजन साळवी यांच्यापेक्षा राहुल नार्वेकर यांना अधिक मतं
बहुमतापेक्षा अधिक मतं मिळवण्यात राहुल नार्वेकरांना यश
164 मतं मिळवत राहुल नार्वेकरांची सरशी
बंडखोर आमदारांची सगळी मतं राहुल नार्वेकरांच्या बाजूने
संपूर्ण शिंदे गट राहुल नार्वेकरांच्या पाठीशी
शिंदे गटाकडून शिवसेनेच्या व्हीपला केराची टोपली
आता फक्त औपचारीक घोषणाची प्रतीक्षा, राहुल नार्वेकर होणार विधानसभा अध्यक्ष
शिवसेना आता न्यायालयीन लढा लढण्याची शक्यता, व्हीप न पाळलेल्या आमदारांचं काय होणार? चर्चांना उधाण
भाजपच्या राहुल नार्वेकरांनी मिळवली 145+ मतं
राहुल नार्वेकरांना बहुमतापेक्षा जास्तीची मतं
भाजपच्या राहुल नार्वेकरांचा विजय जवळपास निश्चित
एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरा आमदारांचं राहुल नार्वेकरांना मतदान
शिंदे गटाने शिवसेनेचे व्हीप मोडला, गोगावलेंची व्हीप पाळला
राहुल नार्वेकर यांनी मिळवली 164 मतं
Maharashtra assembly speaker election : जयंत पाटील यांचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जोरदार टोला
विधान परिषदेच्या आमदारांसह विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवरुनही महत्त्वाच विधान
पाहा जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेचा व्हीप बंडखोर आमदारांनी पाळला नाही
शिंद गटाच्या आमदारांकडून शिवसेनेच्या व्हीपला केराची टोपली
शिंदे गटातील बंडखोर आमदारांचं भाजपच्या राहुल नार्वेकरांना मतदान
राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी निवडणूक येण्याची दाट शक्यता
Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : मतमोजणी सुरु असेपर्यंत सभागृहाचे दरवाजे बंद
फडणवीस, जयंत पाटील यांच्या आक्षेपानंतर दुसऱ्यादा मतमोजणी सुरु
पाहा विधानसभेच नेमकं काय घडतंय?
Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : मतमोजणीत चूक होतेय- जयंत पाटील
देवेंद्र फडणवीस यांचं जयंत पाटील यांचं अनुमोदन
मतमोजणीत गोंधळ होत असल्यावरुन आक्षेप
सभागृहात मतमोजणीवरुन गोंधळ
Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : आवाजी मतदानाला पोलने आव्हान
आता मतमोजणी केली जाणार
नाव आणि अनुक्रमांत आमदारांना उच्चारावं लागणार
पोलला विधानसभा उपाध्यक्षांचा हिरवा झेंडा
आता हेडकाऊंट होणार
आमदारांना जागेवरच उभं राहून नाव आणि अनुक्रमांच उच्चारावा लागणार
10 मिनिटांसाठी सभागृहाचे दरवाजे बंद राहणार
चेतन तुपेंकडून राजन साळवींचा प्रस्ताव
चंद्रकांत पाटील यांच्याकडून राहुल नार्वेकरांचा प्रस्ताव
आमदारांना प्रस्तावाच्या बाजूने अथवा विरोधात मतादन करावं लागणार
आमदारांनी नावं व अनक्रमांक जागेवर उभं राहून उच्चारावं
विरोधकांनी पोल मागितल्यानं आता आवाजी मतदानाच्या पुढची प्रक्रिया सुरु
Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : नाना पटोलेंमुळे आम्हाला आजचा दिवस पाहायला मिळाला
देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला
नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे पार पडतेय विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक
Maharashtra assembly speaker election : राज्यपालांना जयंत पाटील यांचा जोरदार टोला
राज्यपालांनी 12 विधान परिषद आमदारांची नियुक्ती करावी, जयंत पाटील यांचं आवाहन
एकनाथ शिंदे यांनाही जयंत पाटील यांचा टोला
अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात
एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परिचय
तसंच नव्या सभासदांचाही मुख्यमंत्र्यांकडून परिचय
आधी हकालपट्टीची बातमी, आता सारवासारव
शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेमध्ये असल्याचं स्पष्टीकरण
सामना दैनिकातून दिलेली बातमी ही अनावधानाने दिल्याचं शिवसेनेचं स्पष्टीकरण
आढळराव पाटील यांच्या पक्षविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी केल्याची देण्यात आलेली माहिती
आता पुन्हा ते शिवसेनेमध्ये असल्याची स्पष्टीकरण देत पक्षाकडून सारवासारव
अजित पवारांपाठोपाठ आदित्य ठाकरेही विधान भवनात दाखल
सचिन अहिर विधान भवनात दाखल
मिलिंद नार्वेकरही माध्यमांच्या समोर
एवढा बंदोबस्त कशासाठी – आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवरुन पलटवार
कसाबलाही असं आणलं नसेल, आमदार आणि मीडियामध्ये अशी दोरी नव्हती- आदित्य ठाकरे
कसाबच्या वेळीही आम्ही असा बंदोबस्त पाहिलेला नव्हता- आदित्य ठाकरे
आमचा राग मुंबईवर काढू नका, आदित्य ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
मित्रपक्षांसोबत बसू आणि पुन्हा दाखवून देऊ – आदित्य
विधीमंडळ कार्यालय आम्हीच सील केलं, चावी आमच्याकडे, आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण
Ajit Pawar : अजित पवार कोरोनातून बरे झाले आहेत. ते देखील दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनासाठी अखेर उपस्थित झालेत. अजित पवार विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाला येणार की नाह, यावरुन चर्चांना उधाण आलं होतं. अखेर अजित पवार हे देखील विधान सभेत अधिवेशनासाठी हजर झाले आहेत. अजित पवारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वतःला होम आयसोलेट केलं होतं. त्यानंतर आता त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानं अजित पवार हे देखील दोन दिवसांच्या अधिवेशनासाठी विधान भवनात दाखल झालेत.
Maharashtra assembly speaker election : विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बंडखोर शिवसेना आमदारांचं अभिवादन
आधी बाळासाहेब ठाकरेंच्या पुतल्यासमोर बंडखोर आमदारांचं अभिवादन
कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यासमोर नतमस्तक त्यानंतर विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेच्या बंडखोरांचं अभिवादन
सर्व बंडखोर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे विधान भवनात दाखल
सर्व बंडखोर शिवेसना आमदार विधान भवनात दाखल
विजयी मुद्रा करत एकनाथ शिंदे विधान भवनात दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांचे सर्व समर्थक आमदार विधान भवनात दाखल
भगवे फेटे घालून सर्व आमदार विधान भवनात दाखल
एकूण 51 आमदार आपल्यासोबत असल्याचा एकनाथ शिंदे यांचा दावा
Maharashtra assembly speaker election : बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला बंडखोर आमदारांनी अभिवादन केलं
मुंबईत अधिवेशनाच्या आधी कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार हे नतमस्तक झाले
विधानसभेत सभागृहात अध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
Maharashtra assembly speaker election : शिंदे गटाच्या सगळ्या आमदारांचं शक्तिप्रदर्शन
बाळासाहेब टाकरे यांच्या पुतळ्याला बंडखोर आमदार अभिवादन
सर्व आमदार बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक
बाळासाहेबांच्या पुतळ्यासमोर चोख सुरक्षा व्यवस्था
हिंदुदृदयसम्राट यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मगच विधानभवनात जाणार- एकनाथ शिंदे
Maharashtra assembly speaker election : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनात दाखल
विजयी मुद्रा करत फडणवीस विधान भवनात दाखल
भगवे फेटे घालून भाजप आमदार विधान भवनात दाखल
Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : विशेष बसने शिवसेनेचे बंडखोर आमदार हॉटेलातून रवाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बसमधून आमदारांसोबत रवाना
थोड्याच वेळात विधानभवनात दाखल होणार
चोख पोलीस बंदोबस्तात आमदारांचा ताफा विधान भवनाच्या दिशेने निघाले
Sadabhau Khot : शिवसेनेच्या मुखपत्राचं नाव बदलावं, सदाभाऊ खोत यांचा टोला
शिवसेनेनं ‘सामना’चं नाव बदलावं- सदाभाऊ खोत
सामनाचं नाव बदलून काँग्रेस राष्ट्रवादी किमान समान असं नाव करावं, खोत यांची टोलेबाजी
हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका शिवसेनेनं सामनातून घेतली, सदाभाऊ खोत यांचा आरोप
Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : महाविकास आघाडीमुळे विधानसभा अध्यक्षपदाची परंपरा मोडली आहे, भाजपचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार राहुल नार्वेकरांचा टोला
मविआने उमेदावर दिल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे, आतापर्यंत बिनविरोध पार पडत होती निवडणूक
बहुमत आमच्याकडे, विजयही आमचाच होईल, राहुल नार्वेकर यांना विश्वास
व्हीपचा प्रश्नच येत नाही, संख्याबळ आमच्याकडे आहे, राहुल नार्वेकरांचं टीव्ही 9 मराठीशी बोलताना वक्तव्य
Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : विधानसभा अध्यक्षपदाच्या आधी नरहरी झिरवळ यांचं मोठं विधान
शिवसेनेकडून जारी केलेला व्हीपच मान्य केला जाणार
नरहरी झिरवळ यांचं महत्त्वाचं विधान
टीव्ही 9 मराठीशी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचं महत्त्वाचं विधान
शिवसेनेकडून दोन व्हीप जारी झाल्यानं नवा वाद
एकनाथ शिंदे गटाचे भगत गोगावले आणि शिवसेनेचे सुनील प्रभू यांच्याकडून व्हीप जारी
Maharashtra assembly speaker election : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली आम्ही शिवसेना पुढे घेऊन जाऊ, हीच शिवसेना पुढे महाराष्ट्राचं नेतृत्त्व करेल, संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास
बाळासाहेबांचे आशीर्वाद असते, तर तुम्ही महाराष्ट्राचे आज मुख्यमंत्री असता, राऊतांचा फडणवीसांना टोला
जर 50 आमदारांच्या गटाला तुम्ही आज मुख्यमंत्रीपद दिलंय, तर 2019 मध्ये तुम्ही मुख्यमंत्रीपद का नाकारलं? तेव्हाही हेच बंडखोर शिवसेनेत होते ना…- संजय राऊत
फुटिरांना तुम्ही आज खरे शिवसैनिक म्हणत आहात, ही ढोंगं बंद करा, राऊतांचा हल्लाबोल
आम्ही तुम्हाला राज्य चालवण्यासाठी शुभेच्छा देतोय, हे आमच्या मनाचं मोठेपण आहे – राऊत
भाजप आता अटलजींचा पक्ष राहिलाय का? संजय राऊतांचा सवाल
मुंबईवर अतिरेकी हल्ला झालाय का? अशी विचारणा करणारे अनेक फोन देशभरातील नेत्यांचे मला आले- राऊत
बंडखोरांना एवढं भय वाटण्याचं कारण काय? खुलेपणे समोर या, खुलेपणाने संवाद साधून दाखवा – राऊतांना
महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडवण्यात आल्या, त्या संदर्भात ममता बॅनजी, चंद्रशेखर राव यांच्याशी माझा फोन झाला आहे, चर्चा झाली आहे- राऊत
नऊ सरकारं पाडली, पण हे नववं सरकार पाडलेलं त्यांच्या नाकी नऊ आणेल- संजय राऊत
Maharashtra assembly speaker election : शिवसेनेचं विधीमंडळ कार्यालय सील केल्यानंतर आता शिवसेना आमदार विधानसभा उपाध्यक्षांच्या कार्यालयात
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात शिवसेनेची बैठक पार पडणार
आज आवाजी मतदानाचे पार पडणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक
Maharashtra assembly speaker election : विधानभवनातील शिवसेनेचं कार्यालय सील करण्यात आलं आहे. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट हा संघर्ष आता अधिक ताणला जाण्याची शक्यता आहे. आधीच व्हीपवरुन शिंदे गट आणि शिवसेना यांच्या संघर्ष पेटलाय. त्यात आता आणखी एक ठिणगी पडली आहे.
एकनाथ शिंदे यांनी जारी केलेल्या व्हीपमधील शब्दानंशब्द पुढीलप्रमाणे…
भाजपच्या राहुल नार्वेकरांना मतदान करण्याचे शिंदे गटाच्या प्रतोदांकडून व्हीपद्वारे आदेश
शिंदे गटाकडून जारी केलेला व्हीप पुढीलप्रमाणे :
शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय
३०४/३०५ विधानभवन मुंबई ४०००३२ दुरध्वनी २२०२७३९९ विस्तार क्र. १३०२/१३०३, फॅक्स २२०२७७९८
पक्षादेश क्रमांक: ७ / २०२२
दिनांक : २ जुलै २०२२
रविवार, दिनांक : ३ जुलै २०२२ रोजी विधिमंडळाच्या विधानसभेचे मुंबईत विशेष अधिवेशन भरविण्यात येणार आहे. या अधिवेशनात पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक ३ जुलै २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सरकारच्या वतीने अॅड श्री. राहुल नार्वेकर विधानसभा सदस्य हे शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत.
वरील कामी शनिवार, दिनांक २ जुलै २०२२ रोजी, सायंकाळी ७.०० वाजता, हॉटेल ताज प्रेसिडेंट, कफ परेड, मुंबई येथे शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सर्व सन्माननीय सदस्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये सत्तारुढ पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार अॅङ श्री. राहुल नार्वेकर, विधानसभा सदस्य यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी मतदान करण्याबाबत निर्णय करायचा आहे.
यास्तव शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी अवश्य उपस्थित रहावे, असा पक्षादेश आहे.
Maharashtra assembly speaker election : विधानसभा अध्यक्षपदाची नेमणूक मविआने मुद्दाम केली नाही, मुनगंटीवार यांचा आरोप
विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी व्हीप लागतच नाही
सुधीर मुनगंटीवार यांचा दावा
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप गरजेचा नसतो
सभागृहात उपस्थित असलेल्यांपैकी बहुमताने निवडून दिलेला उमेदवार अध्यक्ष ठरवला जातो- मुनगंटीवार
तेव्हा असलेल्या राज्यपालांना मुख्यमंत्री झालेल्यांना आनंद झाला नसेल, म्हणून त्यांनी पेढा भरवला नसेल
सुधीर मुनगंटीवर यांचा शरद पवारांना टोला
उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा अर्थ समजलेलाच नाही- मुनगंटीवार
हाती भगवा मात्र हृदयात स्वार्थ, मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेंना टोला
एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी जारी केलेलं व्हीपचं पत्र समोर
राहुल नार्वेकरांना मतदान करा, बंंडखोर आमदारांसाठी शिंदे गटाचं व्हीप
पाहा व्हीपमध्ये नेमकं काय म्हटलंय?
एकनाथ शिंदे गटाकडून व्हीप जारी, भरत गोगावलेंनी जारी केला व्हीप, भाजपच्या राहुल नार्वेकरांना मतदान करण्याचे आदेश pic.twitter.com/4rMCLPpv8U
— Siddhesh Sawant (@ssidsawant) July 3, 2022
Maharashtra Legislative assembly Special Session Live Update : जिंकणार मीच, महाविकास आघाडीचे विधानसभा अध्यक्षपदासाठीचे उमेदवार राजन साळवी (Rajan Salvi) यांना विश्वास
राजन साळवी यांची टीव्ही 9 मराठीसोबत केली EXCLUSIVE बातचीत
शिवसेनेचे सगळे आमदार आपल्यालात मतदान करतील, राजन साळवी यांचं विधान
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे राजन साळवी विरुद्ध भाजपचे राहुल नार्वेकर असा थेट सामना
मविआने मला उमेदवारी दिली आहे- साळवी
शिवसेनेचे सगळे आमदार मला मतदान करतील- साळवी
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदारही मला मतदान करतील आणि मला निवडून आणतील हा मला विश्वास- साळवी
शिवसेनेचाच व्हीप सर्व सेना आमदारांसाठी बंधनकारक- साळवी
शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसही सोबत आहे, मी जिंकेन याची मला खात्री आहे – साळवी
शिवसेनेच्या व्हीपनुसार बंडखोर आमदारांना मतदान करावंच लागेल- साळवी
बंडखोरांनी जर मतदान केलं गेलं नाही, तर आमदारांना निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल, साळवींची इशारा
सभागृहात आमदारांचं मतपरिवर्तन होईल, असा विश्वास पवारांना वाटत असेल, तर मलाही खात्री वाटतं की आमचा विजय होईल
राजन साळवी यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत करताना व्यक्त केला विश्वास
उद्धव ठाकरेंनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य आहे – राजन साळवी
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून आमदारांना व्हीप जारी
राहुल नार्वेकरांना मतदान करा, भरत गोगावले यांचे व्हीपमधून आदेश
शिवसेनेच्या सुनील प्रभू यांच्याकडूनही आधीच शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी
शिवसेनेकडून राजन साळवी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेनेच्या राजन साळवींऐवजी भाजपच्या राहुल नार्वेकरांना मतदान करण्यासंदर्भात शिंदे गटाच्या आमदारांना व्हीप
विधानसभेचं दोन दिवसीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता
बंडखोर आमदारांचं ताज प्रेसिडंट हॉटेलात मुक्काम
ताज प्रेसिडंट हॉटेलला छावणीचं स्वरुप
आमदारांच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदबोस्त
अधिवेशनासाठी बंडखोर आमदार मुंबईत दाखल
शनिवारी मुंबई विमानतळावरुन विशेष बसने हॉटेलात आमदारांना आणलं
आजपासून सुरु होत असलेल्या अधिवेशनासाठी सर्व बंडखोर आमदार मुंबईत
अजित पवार आज अधिवेशनाला येण्याची शक्यता कमी
कोरोनामुळे प्रकृतीच्या कारणास्तव अधिवेशनाला येणार नसल्याची माहिती
आजपासून विधानसभेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पार पडणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक
शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा अधिवेशनात थेट सामना
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना व्हीप बंधनकारक- जयंत पाटील
शिवसेना प्रमुखांनी नेमलेला व्हीप हाच खरा व्हीप- जयंत पाटील
कायद्याने पक्षप्रमुखांनी नेमलेला व्हीपच खरा व्हीप असतो- जयंत पाटील
सुनील प्रभू हेच खरे व्हीप राहतील- जयंत पाटील
विधानसभा अध्यक्षपदासाठी व्हीप बंधनकारक नसतो, विधानसभा अध्यक्षपदासाठी सदसदविवेक बुद्धीने मतदान करायचं असतं, या चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्यावरही जयंत पाटील यांचं उत्तर
सदसदविवेक बुद्धीनं पक्षविरोधी मतदान करायचं नसतं, जयंत पाटील यांचा टोला
तब्बेत बरी नसल्यानं अजित पवार मतदानाला येणार की नाही, याबाबतही साशंकता
सकाळी 10.30 वाजता राष्ट्रवादीचे आमदार विधान भवना एकत्र जमणार, जयंत पाटील यांची माहिती
Maharashtra assembly speaker election : हॉटेल ओबेरॉयमधील भाजप आमदार 9 वाजता विधान भवनाच्या दिशेने रवाना होणार
विशेष बसने आमदारांना विधान भवनात नेलं जाणार
भाजप आमदार हॉटेल ओबेरॉयमध्ये मुक्कामी
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची आज रणधुमाळी
शिंदे आणि फडणवीस आज शक्तिप्रदर्शन करणार आहेत
सरकार स्थापन केल्यानंतर होत असलेल्या पहिल्यात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शनाची शक्यता आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ताज हॉटेलबाहेर तगड्या पोलीस बंदोबस्तात सध्या आमदार ता प्रेसिडंट हॉटेलात थांबले आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हे सर्व आमदार सकाळी 10 वाजल्यानंतर विधान भवनाच्या दिशेने निघतील.
शिंदे गट आणि भाजपचे आमदार एकत्र विधानभवनात पोहोचतील, असं सांगितलं जातंय.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक का होते आहे हेही समजून घेणं गरजेचंय. काँग्रेसने नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. ही निवड झाल्यानंतर गेल्या वर्षभरापूर्वी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे विधानसभेचं अध्यक्षपदा हे रिक्त झालं होतं. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, अशी मागणी सातत्यानं केली जात होती. मात्र अखेर आता शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्र सरकार स्थापन केल्यानंतर बोलावण्यात आलेल्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडते आहे.
4 फेब्रुवारी 2021 पासून विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त होतं. आता जवळपास दीड वर्षानंतर या पदावर कुणाची निवड होते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तोपर्यंत विधानसभेचं कामकाज उपाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवळ यांनी पाहिलं होतं.
Maharashtra assembly speaker election : काँग्रेसचे आमदार 10 वाजता विधानभवनात जमणार आहेत. काँग्रेस आमदारांना एकत्र केलं जाणार असून पक्षाचे प्रतोद सुरेश वरपुडकर हे व्हीप बजावतील. यावेळी एक बैठक घेतली जाईल. या बैठकीत मतदानासंदर्भात सूचना दिल्या जातील. वरिष्ठ नेते मतदानासंदर्भात आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेस आमदारांना थोड्याच वेळात व्हीप बजावला जाणार असल्याचंही सांगण्यात आलंय. काँग्रेस आमदार शिवसेनेच्या राजन साळवी यांना मतदान करण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांना रिंगणात उतरवण्यात आलंय.