ठाणे : लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज राज्यातील महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. मुंबईसह राज्यातील अनेक शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र, ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. कालच्या महाराष्ट्र बंदमध्ये शिवसैनिक एका रिक्षा चालकाला दमदाटी आणि मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानुसार आज पाच जणांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपमहापौर यांचे पती माजी नगरसेवक पवन कदम हे दमदाटी करत होते. तर माजी नगरसेवक गिरीश राजे हे कानशिलात लगावत होते. तसेच इतर पैकी किरण नाक्ती ,प्रकाश पायरे ,महेंद्र मढवी या सेना पदाधिकारी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेशमध्ये प्रतिबंधक आदेशाचा भंग करुन रिक्षा वाल्याला धमकावून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे नमुद केले आहे.
नेमकं काय घडलं?
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरले होते. ठाण्यात उपमहापौर यांचे पती पवन कदम आणि काही सहकाऱ्यांसह महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, त्यावेळी रिक्षा वाहतूक सुरु असल्याचं पाहून त्यांनी रिक्षाचालकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने तर हातात काठी घेत येणाऱ्या प्रत्येक रिक्षाचालकांना मारत असल्याचं पाहायला मिळालं. पवन कदम यांनीही एका रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ टीव्ही 9 च्या हाती लागला.
पाहा या घटनेचा व्हिडीओ –
महापौर नरेश म्हस्के दिलगिरी व्यक्त करणास तयार
दरम्यान, ठाण्यात शिवसैनिक रिक्षाचालकांना मारहाण करत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर टीव्ही 9 मराठीने ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. त्यावेळी काही रिक्षाचालक महाराष्ट्र बंद असल्यामुळे ग्राहकांकडून जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र, असा प्रकार कुठे झाला असेल तर मी त्याची चौकशी करेल. या प्रकरणी मी दिलगिरी व्यक्त करण्यासही तयार आहे, असं नरेश म्हस्के म्हणाले.
पवारांचं आवाहन शिवसेनेचे नेते विसरले काय?, दरेकरांचा सवाल
शरद पवारांनी सोलापूरात बोलताना हा बंद शांततेत, संयमान पार पाडण्याचं आवाहन केलं होतं. पण या सरकारमधील तिनही पक्षात ताळमेळ नाही. कुणाचा कुमाला पायपोस नाही, असं दिसत आहे. आपल्याच नेत्याच्या आवाहनाला हरताळ फासण्याचं काम सुरु आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलीय.
Maharashtra Band : ठाण्यात उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना मारहाण! व्हिडीओ उजेडात https://t.co/3FUSp9wUTB @ThaneCityPolice @OfficeofUT @mieknathshinde @BJP4Maharashtra @mipravindarekar @ShivSena @BJP4Maharashtra #MaharashtraBand #Shivsena #Thane #RickshawPullers #BJP
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2021
संबंधित बातम्या :
VIDEO : धक्कादायक ! मुंबई पोलिसातील बडा अधिकारी एनसीबीच्या समीर वानखेडेंवर पाळत ठेवतोय?