Marathi News Politics Maharashtra Cabinet Expansion 2022 Live chief minister Eknath Shinde dcm Devendra Fadnavis Government new cabinet ministers full list Maharashtra Mantrimandal Vistar Updates t
Maharashtra Cabinet Expansion 2022 : कुणाला कोणतं मंत्रीपद मिळणार, कुणाला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार, याचीची चर्चा रंगली होती. आजअखेर यावर पुर्नविराम लागला. शिंदे गटाली कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालंय? जाणून घ्या...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री
Image Credit source: tv9
Follow us on
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोनच मंत्री शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असल्यानं त्यांच्यावर टीका होत होती. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion 2022) पार पडला असून यामध्ये शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये दीपक केसरकर, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार शिंदे गटाच्या आमदारांनी बंड केल्यानंतर पडलं. त्यानंतर शिंदे गटाकडे एक-एक आमदार फुटून गेले. यावरुन या आमदारांना विशेष ऑफर म्हणजेच मंत्रीपदाची ऑफर दिल्याचंही बोलल्या गेलं. तेव्हापासून मंत्रीपदाची चर्चा आहे. कुणाला कोणतं मंत्रीपद मिळणार, कुणाला राज्यमंत्रीपद, कुणाला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार, याचीची चर्चा रंगली होती. आजअखेर यावर पुर्नविराम लागला असून शिंदे गटाली आमदारांना मंत्रीपदात स्थान मिळालंय. कुणाला मंत्रपद मिळालंय जाणून घ्या…
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार
Shiv Sena MLAs Gulabrao Patil and Dadaji Dagadu Bhuse take oath as Maharashtra ministers at Raj Bhavan in Mumbai pic.twitter.com/jkpezoOE1d