मुंबई : लोकसभा निवडणूक निकालानंतर केंद्रातील मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता असतानाच, इकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याबाबतही आडाखे बांधणे सुरु झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद वाट्याला येऊ शकतं.
शिवसेनेच्या वाट्याला काय?
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित असताना शिवसेनेतील परिस्थिती.
सध्या शिवसेनेकडे पाच कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्री पदे आहेत
राज्यमंत्री
लोकसभा निवडणूक निकाल
निवडणूक आयोगाने 2019 ची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा केली. भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळाला. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. यामध्ये त्यात वाढ झाली असली, तरी स्वत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाच अमेठीत पराभव झाला. राहुल गांधी दोन जागेवर उभे होते, त्यापैकी केरळमधील वायनाड इथे त्यांचा मोठा विजय झाला.
लोकसभा निकाल
दरम्यान, लोकसभा निकालात महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 41 जागी यश मिळवलं. यामध्ये भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागी विजय मिळवला. काँग्रेसला अवघी 1 तर राष्ट्रवादीला नवनीत राणांसह 5 जागा मिळाल्या. वंचित बहुजन आघाडीकडून लढणाऱ्या एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी औरंगाबादची जागा काबीज केली.
देशाचा निकाल
महाराष्ट्राचा निकाल
संबंधित बातम्या
आदित्य ठाकरे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा?
Ajit Pawar Exclusive : ‘मावळमधील पराभवाची जबाबदारी अजित पवारची’
Balu Dhanorkar | महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव खासदार नेमका कसा जिंकला?
राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम, पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षपदाच्या शर्यतीत
स्पेशल रिपोर्ट : वांद्रे ते वरळी, आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ कोण सोडणार?
महाराष्ट्राचा महापोल : उद्या निवडणूक झाल्यास महाराष्ट्रातील चित्र काय?