अयोध्या : महाविकासआघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (7 मार्च) अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषेदत राम मंदिराबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. शिवसेनेकडून राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray offeres one crore for ayodhya Ram Mandir) यांनी केली. “राम मंदिर ट्रस्टंच बँक खाते कालच उघडलं आहे. त्यात शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांचा निधी राम मंदिर बांधण्यासाठी दिला जाईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray offeres one crore for ayodhya Ram Mandir)
आमच्या मराठीत एक म्हण आहे, फुल ना फुलाची पाकळी, त्याप्रमाणे मी सरकारकडून नाही तर शिवसेनेच्या ट्रस्टकडून 1 कोटी रुपयांचा निधी राम मंदिराच्या निर्मितीसाठी घोषित करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जर अयोध्येत सरकारकडून जागा मिळाली तर महाराष्ट्रातील भाविकांसाठी अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधा अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. “मी यशस्वी झालो की अयोध्येत येतो. तसेच अयोध्येत आलो की यशस्वी होतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Maharashtra Chief Minister and Shiv Sena Chief Uddhav Thackeray in Ayodhya: Today, I want to announce that not from the state govt, but from my trust, I offer an amount of Rs. 1 crore. #RamTemple https://t.co/HaoGjnu7aE pic.twitter.com/LKsWY9Ab3E
— ANI UP (@ANINewsUP) March 7, 2020
माझ्यासाठी हा सौभाग्याचा क्षण आहे. गेल्या काही दिवसांत मी दोन-तीन वेळा अयोध्येत आलो आहे. शिवसेनेची मागणी होती सरकारने विशेष कायदा बनवून राममंदिर बांधावे, पण कायदा झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळाला.
मी स्वप्नातंही विचार केला नव्हता, मी मुख्यमंत्री झालो. दीड वर्षात तीन वेळा अयोध्येत आलो आहे आणि पुन्हा येणार. मला अयोध्येत शरयू आरती करण्याची फार इच्छा होती, पण कोरोनामुळे शरयू आरती रद्द केली. पण पुढील वेळी येईन तेव्हा शरयू आरती करेन, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
मी तिसऱ्यांदा अयोध्येत येणं हे सौभाग्य आहे. मी येथे येणार, पुन्हा पुन्हा येईन. मी अयोध्येत आलो की मला माझे वडील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. मी नोव्हेंबरमध्ये अयोध्येला आलो. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री झालो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मी अयोध्येला नियमित येणार आणि नियमित येत राहणार. माझी शरयू नदीची आरती करण्याची फार इच्छा होती. मात्र कोरोनामुळे शरयू नदीची आरती करु शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मी मंदिरासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करतो. तसेच या ठिकाणच्या सरकारला (उत्तर प्रदेश सरकारला) या ठिकाणी महाराष्ट्रातील लोकांसाठी महाराष्ट्र भवन बनवावे अशी विनंतीही करतो. महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन निर्मितीचा मानस आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मी भाजपपासून दूर, हिंदुत्वापासून नाही
भाजप आणि हिंदुत्व वेगळं आहे. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. मी भाजपला सोडलं आहे हिंदुत्व नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला. तसंच महाराष्ट्रातील सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालतंय, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असं त्यांनी सांगितलं.
गेल्या एक दीड वर्षात मी तिसऱ्यांदा अयोध्येत आलो. मी पुन्हा पुन्हाइथे येणार आहे. पुढेही येत राहणार. कोरोना व्हायरसमुळे यंदा शरयूची आरती करु शकलो नाही. त्यामुळे ती आरती मी रद्द केली. आमच्या ट्रस्टकडून मी राम मंदिरसाठी एक कोटी रुपये देतो. हे मंदिर पाहण्यासाठी जगभरातून लोक येथे यावेत अशी माझी इच्छा आहे. मी भाजपापासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही, भाजप आणि हिंदुत्व वेगळे आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या
LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल, उत्तर प्रदेश पोलिसांकडून गार्ड ऑफ ऑनर