औक्षणावेळी महिला म्हणाल्या, ईडा-पिडा टळो, बळीचं राज्य येवो, उद्धव म्हणाले…..

| Updated on: Nov 29, 2019 | 3:53 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ग्रँड एण्ट्री केली. ‘मातोश्री’वरुन जवळपास दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray arrives at Mantralaya) मंत्रालयाकडे रवाना झाले.

औक्षणावेळी महिला म्हणाल्या, ईडा-पिडा टळो, बळीचं राज्य येवो, उद्धव म्हणाले.....
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ग्रँड एण्ट्री केली. ‘मातोश्री’वरुन जवळपास दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray arrives at Mantralaya) मंत्रालयाकडे रवाना झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हुतात्मा चौकात अभिवादन करुन मंत्रालयाकडे कूच केली. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray arrives at Mantralaya)

मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं औक्षण केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांना ओवाळताना महिलांनी ईडा-पिडा टळो, बळीचं राज्य येवो, असं म्हटलं. त्यावर नव्या मुख्यमंत्र्यांनी बळीराजाचं राज्यच येणार असं म्हणत ओवळणीच्या ताटात ओवाळणी दिली.

उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला शिवसेनेचे सर्व बडे नेते उपस्थित होते. याशिवाय उद्धव ठाकरेंसोबत शपथ घेतलेले मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि नितीन राऊत हे सुद्धा उपस्थित होते.

मंत्रालयाचे सर्व मंजले खचाखच भरले होते. उद्धव ठाकरे यांच्या एण्ट्रीदरम्यान सर्व कर्मचाऱ्यांसह मंत्रालयातील उपस्थित सर्वजण बाहेर येऊन थांबले होते. उद्धव ठाकरे यांना हार-तुरे देऊन स्वागत करण्यात आलं.

या स्वागतानंतर उद्धव ठाकरे अँटीचेंबरमध्ये गेले. तिथे मंत्र्यांसोबत थोडावेळ चर्चा करुन, दुपारी 3 नंतर ते कॅबिनेट बैठक घेणार आहेत.

VIDEO :