Video : ‘अपेक्षेपेक्षा जास्त मदत करु’ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मुख्यमंत्री शिंदेकडून व्हिडीओ कॉल करत विचारपूस

| Updated on: Aug 09, 2022 | 7:27 AM

Eknath Shinde Video Call : नांदेड जिल्ह्यातील नांदुसा गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.

Video : अपेक्षेपेक्षा जास्त मदत करु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मुख्यमंत्री शिंदेकडून व्हिडीओ कॉल करत विचारपूस
मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांसोबत संवाद
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नांदेड : नांदेड (Nanded News) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणं राहून गेलं होतं, अशा शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांची विचारपूस केली. तसंच शेतकऱ्यांना (Maharashtra Farmers) मदत करण्याचं आश्वासनही दिलं. अपेक्षेपेक्षा जास्त मदत करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं. येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेऊन आणि आतापर्यंत दिले गेली नसेल, इतकी जास्त मदत शेतकऱ्यांना दिली जाईल, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना आश्वास्त केलं. नांदेड तालुक्यातील नांदुसा गावचे सरपंच भास्कर जानकवडे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यावेळी गावातील इतर शेतकरी देखील उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, असा पुनरुच्चारही यावेळी शिंदे यांनी केला.

पाहा व्हिडीओ :

नांदेड जिल्ह्यातील नांदुसा गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. नांदेड, हिंगोली भेटीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी बहुतांश शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. पण ज्या शेतकऱ्यांची भेट घेण्याचं राहिलं होतं, त्यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. सरकार शेतकरी आणि कष्टकरी जनेते असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत ठोस निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असं शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे शेतकऱ्यांना सांगितलं.

हे सुद्धा वाचा

तुमचं शेत पाहणं राहून गेलं, पण तुम्ही कोणतीही काळजी करु नका, पंचनामे झाले का? आम्ही लवकरच मदत जाहीर करणार आहोत, अपेक्षेपेक्षा जास्त मदतीची घोषणा हे सरकार करेल, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर दिला.

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांबाबत विशेष पॅकेज जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यासाठी सरकारकडून आता नेमकी किती आर्थिक मदत जाहीर केली जाते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.