मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानावरून (Bhagat Singh Koshyari Statement) राज्यात वादंग निर्माण झालं आहे. अश्यात विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray) कोश्यारींच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे. “राज्यापालांचं विधान वैयक्तिक, त्याच्याशी आम्ही सहमत नाही”, असं शिंदे म्हणाले आहेत. “राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्याच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई मिळाली. बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहीत आहे. उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा केला. राज्यपालांनीही खुलासा केला आहे. राज्यपाल हे मोठं पद आहे. संविधानिक पद आहे. त्यामुळे कुणाचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मराठी माणसाच्या त्याग आणि योगदानाची अवहेलना करता येणार नाही. मराठा माणसाच्या मेहनतीवरच मुंबई आर्थिक राजधानी बनली आहे. इतर राज्यातील लोक आणि समाजातील लोक व्यापार करतात. मुंबईचं जे महत्त्व आहे. त्यामुळे होत असतं. त्यामुळे त्याचं श्रेय घेता येत नाही. मराठी माणसाची अस्मिता कुणालाही हिरावून घेता येणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ते माध्यमाशी बोलत होते.
राज्यपाल म्हणून त्या खुर्चीचा मान राज्यपालांनी ठेवला पाहिजे. पण त्या खुर्चीत बसवलेल्या कोश्यारींनी त्या खुर्चीचा मान ठेवला नाही. गेल्या तीन वर्षातील त्यांची विधाने असतील काही त्यांचे कॅमेऱ्याने टिपलेली दृष्य असतील ते पाहिल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी असे माणसे का येतात हा प्रश्न पडला आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानावरून टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत कोश्यारींच्या विधानाचा समाचार घेतला. त्यांनी राज्यपालांवर कारवाईवर करण्याची मागणी केली.
काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही. कालच्या त्यांच्या विधनानंतर हा त्यांनी खुलासा केला आहे.