काँग्रेस हायकमांडनं नियुक्त केलेली टीम नाना पटोले वाचलीत का? एका क्लिकवर सर्व नावं

| Updated on: Feb 05, 2021 | 3:46 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या साथीला 6 कार्यकारी अध्यक्ष आणि 10 उपाध्यक्षांची तगडी टीम असणार आहे. (Maharashtra Congress Nana Patole team)

काँग्रेस हायकमांडनं नियुक्त केलेली टीम नाना पटोले वाचलीत का? एका क्लिकवर सर्व नावं
Follow us on

मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीनं महाविकासघाडी सरकार स्थापन करण्याऱ्या काँग्रेसनं नाना पटोलेंसारख्या आक्रमक नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. नाना पटोलेंच्या साथीला 6 कार्यकारी अध्यक्ष आणि 10 उपाध्यक्षांची तगडी टीम असणार आहे. काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयानंतर काँग्रेस महाराष्ट्रात बळकट कशी होणार ते पाहावे लागणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये एकूण 37 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. ( Maharashtra Congress President Nana Patole and his powerful team with six Working President and ten Vice President )

नाना पटोलेंची तगडी टीम (Nana Patole Team)

नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेस प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सांभाळताना या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरण्याची शक्यता आहे.

कार्यकारी अध्यक्ष कोण?

1. शिवाजी मोघे (यवतमाळ)
2. बस्वराज पाटील (उस्मानाबाद)
3. नसीम खान (मुंबई)
4. कुणाल पाटील (धुळे)
5. चंद्रकांत हंडोरे (मुंबई)
6. प्रणिती शिंदे (सोलापूर)

काँग्रेसचे 10 नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष कोण?

1. शिरीष चौधरी (जळगाव)
2. रमेश बागवे (पुणे)
3. हुसैन दलवाई (मुंबई)
4. मोहन जोशी (पुणे)
5. रणजीत कांबळे (वर्धा)
6. कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद)
7. बी. आय. नगराळे
8. शरद अहेर (नाशिक)
9. एम. एम. शेख (औरंगाबाद)
10. माणिकराव जगताप (रायगड)

Maharashtra Congress President | काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची वर्णी

नाना पटोले यांचा राजीनामा

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी काल अखेर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला होता. गेल्या काही दिवसांपासून पटोले यांचे नाव महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होतं. त्यावर हायकमांडने अखेर शिक्कामोर्तब केल्यानंतर पटोले यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आज नाना पटोले यांच्या नावाची घोषणा झाली.

राहुल गांधींची भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानल्या जाणाऱ्या नाना पटोले यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. दिल्लीतील 10 जनपथ या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील समोर आला नव्हता. मात्र, या भेटीनंतर नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीच्या आणखी एक पाऊल जवळ आल्याचे बोलले जात होते.

संबंधित बातम्या:

आर आर पाटलांच्या पोलीस भावाचा सत्कार, आबांच्या आठवणींनी अजितदादा गहिवरले

( Maharashtra Congress President Nana Patole and his powerful team with six Working President and ten Vice President )