मुंबई : काही दिवसात केंद्रात मोठे बदल होण्याचे संकेत (Modi Cabinet Reshuffle) मिळाले आहेत. महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांना दिल्लीत संधी मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे वर्षभरात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता असल्यामुळे नव्या चेहऱ्यांना केंद्रात संधी देण्यात येणार (Maharashtra Political Crisis) आहे. तर काही नेत्यांना सुट्टी देऊन पक्षाचं काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. मागच्यावेळी मोदींच्या मंत्रीमंडळात फेरबदल झाला होता. त्यावेळी 43 मंत्र्यांना संधी देण्यात आली होती. सध्या जो फेरबदल होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील (latest political news) अनेक नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
नव्या मंत्रीमंडळामध्ये कोणाला बाहेरचा रस्ता मिळणार ? कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे. सगळ्यात जास्त संधी महाराष्ट्रातील नेत्यांना देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात रविवारी राष्ट्रवादीचा गट फुटून भाजपमध्ये गेल्यामुळे नेमकी संधी कुणाला मिळणार अशी देखील चर्चा आहे
महाराष्ट्रात वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांचा गट भाजप सोबत गेल्यामुळे भाजपने पुन्हा महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यावेळी केंद्राने एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात घातली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना निराश केली असल्याची संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजकारणात चर्चा होती. आता देवेंद्र फडणवीस यांना मोठे करण्याची वेळ आली आहे. फडणवीस यांना दिल्लीत बोलवण्याची शक्यता अधिक आहे. मोदी सरकारच्या काळात त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
शिंदे गट भाजपमध्ये सामील झालाय त्याला एक वर्षे झालं आहे. त्यामुळे शिवसेना पक्षातील काही नेत्यांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रतापराव जाधव यांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भावना गवळी यांचं सुध्दा नाव चर्चेत आहे.
महाराष्ट्रात दोन दिवसापूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार राष्ट्रवादीचा एक गट घेऊन भाजपमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांना आश्वासन देण्यात आलं आहे की, त्यांच्यासोबत असलेल्या एका नेत्याला केंद्रीय मंत्रीमंडळात संधी देण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या गटात असलेल्या प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद मिळू शकते. प्रफुल्ल पटेल आता राज्यसभेचे खासदार आहेत. याआधी ते यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री होते. मागच्या महिन्यात शरद पवार यांनी पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष बनवलं होतं.