नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी घोषणा (Uddhav Thackeray big announcement winter session) केली. राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ (farm loan waiver Maharashtra) करण्यात येणार आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेव्यतिरिक्त उद्धव ठाकरेंनी 10 महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा (Uddhav Thackeray big announcement winter session) केल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या 10 मोठ्या घोषणा
1) महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार.
2) गोरगरीबांना 10 रुपयांमध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. ही योजना प्रायोगिक तत्वावर 50 ठिकाणी सुरु होणार आहे.
3) पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा.
4) समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार पैसा देणार. कर्जाच्या व्याजापोटी सरकारला पैसे द्यावे लागत होते. महामार्गासाठी राज्य सरकारच पैसा उभारणार असून यामुळे व्याजापोटी जाणारे अडीच हजार कोटी रुपये वाचणार.
5) समृद्धी महामार्गालगतच्या विकास प्रकल्पातून पाच लाख रोजगार निर्माण करणार.
6) यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 253 कोटी रुपये देणार
7) कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना करु
8) सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थिगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही
9) आदिवासी बांधवासाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद
10) मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही.
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरेंकडून कर्जमाफीची घोषणा, आदित्य ठाकरे म्हणतात…
ना फॉर्म भरण्याची अट, ना रांगेत उभे राहण्याची कटकट, कर्जमाफीसाठी फक्त एकच अट
मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात, देवेंद्र फडणवीस यांची कर्जमाफीवर टीका
नव्या कर्जमाफीसाठी कोण पात्र? कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी काय?