पुणे : मुसळधार पावसामुळं राज्यभरात मोठी दाणादाण उडाली आहे. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अशावेळी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, राज्य सरकारकडून पंचनामे करुन मदत दिली जाईल, अशी माहिती सरकारमधील मंत्र्यांकडून दिली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. (MP RanjitSingh Naik Nimbalkar criticizes Maha Vikas Aghadi government for helping farmers)
राज्य सरकारची दानत नसेल तर राज्य सरकारनं केंद्राकडे मागणी करावी. केंद्र सरकार म्हणून मदत केली जाईल, अशा शब्दात नाईक निंबाळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. राज्य सरकारनं आधी आश्वासन देऊनही मदत केली नाही. त्यांच्याकडून शेतकरी मदतीची काय अपेक्षा करणार. महाविकास आघाडी सरकारनं गारपीट, दुष्काळातील मदतीचं आश्वासन पाळलं नाही. शेतकऱ्यांना कसलीही मदत केली नाही. आतापर्यंत केंद्र सरकारनं वेळोवेळी मदत केली आहे, असा दावा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलाय. एफआरपीचे तुकडे होऊ नयेत ही आमची भूमिका आहे. आमचाही कारखाना आहे. मात्र, शेतकऱ्यांचं नुकसान नको, असंही नाईक-निंबाळकर यावेळी म्हणाले.
माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मराठवाडा विदर्भात मुसळधार पावसामुळं झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना थेट मदत देण्याची मागणी केलीय. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या म्हणजेच राष्ट्रवादी कांग्रेसच्या सत्काराच्या कार्यक्रमावरुन यावरुन जंयत पाटील आणि संजय बनसोडे यांच्यावर निशाणा साधला आहे. सदाभाऊ खोत यांनी “चक्रिवादळ, अतिवृष्टी, महापुरामुळे आम्ही शेतकरी गेलो सरणावर…! अन् माझ्या सरणावरची फुले चला उधवुया मंत्र्याच्या अंगावर….!!,अशा शब्दात जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘राजाने मारले आणि पावसाने झोडपले’ तर दाद कुणाकडे मागायची अशीच अवस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आज झाली आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले. मायबाप सरकार आता फक्त आश्वासन नाही तर थेट मदत द्या. माझ्या शेतकरी बांधवांना धीर द्या, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारकडं केली आहे.
पूर परिस्थिती ची परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीत प्रशासन, शासन बांधावर पोहचले पाहिजे. मराठवाड्यात शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे , आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील रस्त्याच्या कडेला पाहणी करताये, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. राजकीय कार्यक्रमाच्या बरोबरच रस्त्यावरील शेतावर जाऊन पाहणी केली. जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. त्यांनी ठरविले तर मराठवाड्याला न्याय मिळू शकेल, आणि अशी पाऊले ते उचलतील अशी मला अपेक्षा आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
इतर बातम्या :
उस्मानाबाद : पुनर्वसनाची मागणी करीत इर्ला ग्रामस्थांनी अडविले पालकमंत्र्यांना
MP RanjitSingh Naik Nimbalkar criticizes Maha Vikas Aghadi government for helping farmers