मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. महाविकास आघाडी सरकारला अविश्वास ठरावाचा सामना करावा लागेल हे निश्चित होते. मात्र तो कधी याबाबत निश्चित कोणालाही अंदाज नव्हता. अखेर तो दिवस आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे पत्र पाठवले आहे. उद्याच बहुमत सिद्ध करण्यास देखील सांगितले आहे. आम्ही उद्याच्या बहुमत चाचणीत सहभागी होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र बहुमत चाचणीत सहभागी होणयासाठी मुंबईत येणाऱ्या बंडखोर आमदारांचा मुक्काम नेमका कुठे असणार याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे. शिवसेनेतून (shivsena) 40 पेक्षा अधिक आमदार हे शिंदे गटात सहभागी झाल्याने ही बहुमत चाचणी महाविकास आघाडीसाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे.
राज्यापालांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आले आहे. उद्या बहुमत सिद्ध करावे असे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. उद्याच बहुमत सिद्ध करावे लागणार असल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आम्ही उद्याच्या बहुमत चाचणीत सहभागी होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र बहुमत चाचणीत सहभागी होण्यासाठी मुंबईत उद्या दाखल होणाऱ्या बंडखोर आमदारांचा मुक्काम कुठे असेल याबाबत मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. जरी एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांच्या मुक्कामाचे ठिकाण सांगण्यास नकार दिला आहे, मात्र या आमदारांच्या मुक्कामाचे ठिकाण मुंबई, ठाणे, सुरत, आणि गोवा या चार ठिकाणांपैकी एक असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा | सत्तेचं गणित |
---|---|
विधानसभेचे एकूण सदस्य | 288 |
दिवंगत सदस्य | 01 |
कारगृहात सदस्य | 02 |
सध्याची सदस्य संख्या | 285 |
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार | 39 |
आता सभागृहाची सदस्य संख्या | 285 |
बहुमताचा आकडा | 143 |
भाजपचं संख्याबळ | भाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172 |
मविआचं संख्याबळ | शिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111 |
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ? | भाजप (106)+ अपक्ष (27) = 133 |
राज्यपालांचा हा निर्णय म्हणजे मोदींच्या राफेल विमानपेक्षाही अधिक वेगवान आहे. राज्यपालांचा विशेष अधिवेशनाचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.