मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत (ajit pawar meet sharad pawar) आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या 4 दिवसात कोसळल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकासआघाडीचं सरकार येणार हे निश्चित झालं (ajit pawar meet sharad pawar) आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीचे नेते राजभवनावर सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेले आहेत. तर दुसरीकडे बंडखोरीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक येथे दाखल झाले आहेत. यामुळे सर्वांचे या बैठकीकडे लक्ष लागले (ajit pawar meet sharad pawar) आहे.
शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बैठक सुरु आहे. या बैठकीला राष्ट्रवादीशिवाय शिवसेनेचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या बैठकीला छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित आहेत.
दरम्यान नुकतंच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद ट्रायडेंट हॉटेलला पार पडली. या पत्रकार परिषदेनंतर शरद पवार तातडीने सिल्व्हर ओकवर रवाना झाले होते. तर दुसरीकडे अजित पवारही त्यांच्या निवासस्थानाहून सिल्व्हर ओकच्या दिशेने रवाना (ajit pawar meet sharad pawar) झाले होते.
Mumbai: Meeting underway between NCP Chief Sharad Pawar, Ajit Pawar, and Supriya Sule at Silver Oak, the residence of Sharad Pawar. #Maharashtra https://t.co/xGoEYoOQZ2
— ANI (@ANI) November 26, 2019
मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच!
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी महाविकासआघाडीच्या नेतेपदी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असावे असा ठराव मांडला. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना नावाला एकमताने मंजूरी देण्यात आली. यामुळे आता महाराष्ट्रात ठाकरे सरकार असणार आहे.
राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावलं
राज्यपालांनी विधानसभेचं विशेष सत्र उद्या (27 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजता बोलावलं आहे. यावेळी विधानसभेतील सर्व सदस्यांचा शपथविधी पार पडेल. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर सदस्यांना आमदारकीची शपथ देतील. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीला बहुमत सिद्ध करावं लागेल.
देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा राजीनामा
दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis press conference) यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे, आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी राजीनामा देत आहे, असं सांगितलं. त्यामुळे अवघ्या चौथ्या दिवशी देवेंद्र फडणवीस सरकार कोसळले. बहुमतासाठी आवश्यक आमदार आमच्याकडे नाहीत त्यामुळे मी राजीनामा देतं आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.