नागपूर : भाजप शिवसेनेतील सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम (Nitin Gadkari on Maharashtra government formation) आहे. तर दुसरीकडे भाजपने अल्पमताचं सरकार नको असे राज्यपालांच्या भेटीदरम्यान सांगितले आहे. त्यामुळे “भाजपकडून शिवसेनेची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार,” असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले (Nitin Gadkari on Maharashtra government formation) आहे.
सत्तास्थापनेसाठी शिवसेनेशी बोलणी सुरु आहे. गडकरी यांच्या या वक्तव्यावरुन भाजप सेनेची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. असे असलं तरीही भाजप कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री पदावरचा आपला दावा सोडायला तयार नसल्याचेही दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी आमचे नेते आहे. असेही नितीन गडकरी म्हणाले.
मला राज्यात यायचं नाही. मी आता दिल्लीत रमलो आहे. असे स्पष्टीकरण केंद्रातून महाराष्ट्रात परतण्याच्या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी दिले. तसेच याबाबत मोहन भागवत किंवा संघाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. असेही नितीन गडकरी यांनी ( ) सांगितले.
सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवस उलटले. मात्र, सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. बहुमत मिळवूनही भाजप-शिवसेना युतीने सत्ता स्थापन केलेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन खडाजंगी पाहायला मिळत आहे. 9 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन करणं आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
शरद पवारांनी आपण विरोधात बसणार असल्याचं म्हटलं असलं, तरी त्यांच्या दिल्ली भेटीने अनेक पर्यायांची चाचपणी सुरु असल्याचं दिसतं.
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. मात्र सेनेला थेट पाठिंबा देणं काँग्रेससाठी अडचणीचं (Congress Conditionally Supports Shivsena) आहे. शिवसेनेला थेट पाठिंबा दर्शवला तर अन्य राज्यात त्याचा परिणाम होऊ शकतो.